सावकारी शेतकरी कर्ज माफी संदर्भातील नवीन जी आर आज म्हणजेच दिनांक २७ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. या जी आर नुसार १ कोटी एवढा निधी देखील वितरीत करण्यात येणार आहे.
मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले असेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यत आलेला आहे.
नेमके कशा पद्धतीने हे कर्ज माफ केले जाणार आहेत जाणून घेवूयात याविषयी सविस्तर माहिती. विदर्भ व मराठवाद्यातील ज्या शेतकरी बांधवानी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले असेल तर कर्ज आता माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाणार आहे.
सावकारी शेतकरी कर्ज माफी फक्त परवानाधारक सावकारांचीच केली जाणार.
शेतकरी बंधुनो याकडे लक्ष असू द्या कि केवळ त्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे.
खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही हे लक्षात असू द्या.
आज दिनांक २७ जुलै २०२२ रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला असला तरी हे कर्ज माफी देण्यासाठी १३ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आलेला असून त्यासाठी १ कोटी एवढा निधी वितरण करण्यात येणार आहे.
कर्ज माफी साठी यांनी केले प्रयत्न
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक अडचण भासते अशावेळी शेतकऱ्यांना बँकेकडून लगेच कर्ज मिळणे शक्य नसते. अशावेळी शेतकरी बांधव खाजगी सावकारांकडून कर्ज काढतात आणि आपली शेतीची कामे भागवितात. बँकेची कर्ज माफ केली जातात परंतु खाजगी सावकारांकडून घेतलेय कर्जाचे काय असा प्रश्न उपस्थित होतो.
मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे सावकारग्रस्त शेतकरी समिती बुलढाणा यांच्यावतीने श्री अरुण सीताराम इंगळे यांनी एक जनहित याचिका न्यायालयास सादर केली होती.
पुढील लेख पण वाचा याच विधवा महिलांना मिळणार २४ हजार रुपये आर्थिक सहाय्य
सावकारी कर्ज माफी
त्यानुसार २०१९ वर्षातील तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ज्या शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून कर्ज घेतलेले आहेत ती माफ करण्यासाठी कार्यक्षेत्राची अट एकवेळेस शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाच्या अभीप्रयासह सादर केला होता.
येथूनच सुरुवात झाली ती एखाद्या शेतकऱ्याने खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतले असेल तर ते माफ करण्याची.
या संदर्भातील सविस्तर जी आर देखील १३ सप्टेंबर २०१९ रोजी काढण्यात आलेला होता. तो जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर शेतकरी बंधुंनो तुम्ही एखाद्या खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले असेल आणि त्या सावकाराकडे सावकारिचा सरकारी परवाना असेल तर ते कर्ज आता माफ केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.