५० हजार प्रोत्साहन योजना या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ नवीन GR

५० हजार प्रोत्साहन योजना या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ नवीन GR

बऱ्याच दिवसापासून ५० हजार प्रोत्साहन योजना संदर्भात उत्सुकता लागलेली होती. आता हि योजना शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान योजनेचा जी आर आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा दिला जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकरी बांधवानी अल्पमुदतच्या कर्जाची नियमित परतफेड केली त्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन योजना लाभ देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली होती जो कि २०२० मध्ये करण्यात आलेला होता.

विविध शासकीय योजनांची माहिती मोफत मोबाईलवर हवी आहे का. मग आमच्या व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.

५० हजार प्रोत्साहन योजना मध्ये बदल.

याच काळात म्हणजेच २०२० मध्ये कोरोन परिस्थिती चिघळली होती त्यामुळे महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी विस्कटून घेली होती परिणामी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना वितरीत करता आले नाहीत.

आता महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना लवकरच वितरीत केला जाणार आहे.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या. विधवा योजना महिलेस मिळणार २४ हजार रुपये अनुदान.

जाणून घ्या ५० हजार प्रोत्साहन योजना मधील महत्वाच्या बाबी.

  • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी २०१७-२०१८, २०१८-२०१९, २०१९-२०२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची फेड केली तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • २०१७ – २०१८ चे पिक कर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे.
  • २०१८ – २०१९ या वर्षातील पिक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे.
  • २०१९ – २०२० चे कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत फेडलेले असणे गरजेचे आहे.

प्रोत्साहन योजनेचा लाभ देताना एखाद्या शेतकऱ्याने अनेक बँकाकडून कर्ज घेतलेले असेल अशावेळी एक किंवा अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून रु. ५० हजार या कमाल मर्यादेत लाभ मिळणार आहे.

जुन्याच पद्धतीने राबवली जाणार ५० हजार प्रोत्साहन योजना

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ ज्या पद्धतीने राबविण्यात आलेली होती अगदी तशाच पद्धतीने प्रोत्साहन अनुदान योजना देखील राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदतीतील कर्ज विचारात घेण्यात येईल.

50 हजार प्रोत्साहन अनुदान

खालील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

  • ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजेच या योजना अंतर्गत त्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार नाही.
  • राज्य किंवा केंद्र शासनाची नोकरी करणारे कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांचा पगार २५००० पेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • शेती व्यतिरिक्त आय कर भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत.

वरील प्रमाणे अजूनही बऱ्याच बाबी आहेत ज्या कि सविस्तरपणे शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत. हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *