केवळ २१० रुपयामध्ये ५ हजार रुपयाची अटल पेन्शन योजना. तुम्ही जर सर्वसमान्य नागरिक असाल किंवा शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला २१० रुपयामध्ये ५ हजाराची पेन्शन मिळणार आहे.
तरुणपणी माणसाच्या हातामध्ये पैसा उपलब्ध होऊ शकतो परंतु हाच पैसा उपलब्ध करण्यासाठी वृद्धपकाळामध्ये संघर्ष करावा लागू शकतो. २१० रुपयामध्ये ५ हजराची पेन्शन मिळणार असेल तर नक्कीच हि आनंदाची बाब आहे.
हि योजना ९ मे २०१५ रोजी भारतामध्ये सुरु करण्यात आलेली आहे. भारतामध्ये आता या योजनेचे सदस्य ४ कोटीपेक्षा अधिक झालेले आहे. हि योजना मुख्यत्वे गरीब जनतेसाठी सुरु करण्यात आलेली आहे.
अटल पेन्शन योजना अंतर्गत मिळेल १ ते ५००० हजार रुपयांपर्यंत पेन्शन
वयाच्या ६० वर्षा नंतर १ ते ५००० हजार रुपयांपर्यंत पेन्शन या योजना अंतर्गत मिळू शकते. अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयाच्या १८ ते ४० या काळात गुंतवणूक करता येते.
सर्वसामान्य नागरिक तथा शेतकरी बांधवांसाठी अटल पेन्शन योजना Atal pension yojana सर्वात चांगली परतावा देणारी योजना आहे. या पेन्शन योजने संदर्भात जाऊन घेवूयात संपूर्ण माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेतून चांगला परतावा मिळू शकेल.
अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयानुसार हफ्ता भरावा लागतो. हा हफ्ता किती असतो हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अशी आहे अटल पेन्शन योजना Atal pension yojana APY
ही योजना नेमकी कशी आहे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
- अटल पेन्शन योजना अंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर प्रती महिना १, २, ३, ४ व ५ हजार रुपये मिळू शकतात.
- या योजनेमध्ये सामील होण्यासाठी भारतातील नागरिकांचे वय १८ ते ४० वर्षे इतके असणे गरजेचे आहे.
- बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अटल पेन्शन योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन सादर करणे गरजेचे आहे.
योजनेत सहभागी होऊन लाभ घ्या.
योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.
अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती मराठी भाषेत हवी असेल तर येथे क्लिक करा.
धकाधकीच्या जीवनामध्ये वृद्धापकाळाचा विसर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. अशावेळी जर पैसा नसेल तर जीवन जगताना अडचणी येवू शकतात.
त्यामुळे भविष्याची तजवीज म्हणून जागरूक नागरिकांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ जरूर घ्यावा.
पुढील योजना पण कामाची आहे विधवा महिला योजना २४ हजार रुपये मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज