शिक्षणासाठी कर्ज मिळणार पहा कागदपत्रे पात्रता व इतर माहिती.

शिक्षणासाठी कर्ज मिळणार पहा कागदपत्रे पात्रता व इतर माहिती.

विद्यार्थांना शिक्षणासाठी कर्ज मिळणार असून यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. कोणत्या व्यक्ती पात्र असणार आहेत या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती या लेखामध्ये.

हे कर्ज मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने दिले जाते Maulana azad minorites financial development corporation Ltd. Mumbai.

जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या असक्षम आहेत अशा विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. या शैक्षणिक कर्ज योजनेचा अल्पसंख्यक विद्यार्थी लाभ घेवू शकतात.

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

शिक्षणासाठी कर्ज मिळणार खालील व्यक्ती असणार पात्र.

शिक्षणासाठी कर्ज मिळणार तर आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा तसेच कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात याविषयी काही विद्यार्थ्यांना माहिती नसते. चला तर जाऊन घेवूयात याविषयी सविस्तर माहिती.

सगळ्यात अगोदर जाणून घेवूयात कि मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे अर्थात यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील.

  • मुस्लिम.
  • ख्रिश्चन.
  • जैन.
  • पारशी.

वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना ७.५. लक्ष रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्ती या कर्जाची परतफेड करू शकणार आहेत.

प्रशिक्षण देखील मोफत मिळणार जी आर पहा

मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी आणि ज्यू या धर्मातील विद्यार्थ्याना व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना ७.५ लाखापर्यंत कर्ज मिळत असल्याने विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतात.

पुढील लेख पण वाचा शासन घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणार

शिक्षणासाठी कर्ज मिळणार त्यासाठी खालील पात्रता हवी.

  • अर्जदार अल्पसंख्यांक धर्मातील असावा.
  • विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदवीकेसाठी अर्ज केलेल्या असावा.
  • १८ ते ३२ वर्षे विद्यार्थ्यांचे वय असावे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखापेक्षा अधिक असता कामा नाय.

योजनेचे स्वरूप खालील प्रमाणे असणार आहे.

  • कर्ज मर्यादा 7.5 लाख.
  • व्याज दर फक्त 3 %.
  • परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे .
  • कुटुंबाचे वर्षीक उत्पन्न 8 लाख असावे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज.
  • आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती.
  • अर्जदार अल्पसंख्याक असल्याचा पुरावा
  • अर्जदाराचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
  • अर्जदार व जामिनदार दोन्हीचे ओळखपत्र  
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं. 16.
  • बेबाकी प्रमाणपत्र महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे / वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज / थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे / वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र.
  • जामिनदार
  • सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणार व्यक्ती) किंवा स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण करुन घेणे आवश्यक.
  • मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती – 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा.
  • शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह / घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.
  • दारिद्र्य रेषेखालील उमेदवारांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.mamfdc.maharashtra.gov.in/maulana-azad-education-loan या वेबसाइटला भेट द्या किंवा येथे क्लिक करा
  • Online Application for Education loan असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही जर या योजनेचा प्रथम लाभ घेत असाल तर नवीन नोंदणी करावी लागेल त्यासाठी new registration या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज ऑनलाईन करून त्यांची प्रिंट काढून ती जिल्हा कार्यालयात सादर करावा.

योजना संबंधित बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *