शेती पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ७५ हजारांपर्यंत रक्कम

शेती पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ७५ हजारांपर्यंत रक्कम

कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेती पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती व शेती पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच संस्थांना पुरस्कार देण्यात येतात.

शेती मध्ये कार्य करत असताना एखाद्या व्यक्तीने, संस्थेने किंवा शेतकरी गटांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले असेल तर अशांचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केले जाते.

२०२२ या वर्षासाठी शेती निगडीत अनेक पुरस्कारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्यांचे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील लेख पण वाचा Atma yojana Maharashtra कृषि विभाग आत्मा योजना महाराष्ट्र

शेती पुरस्कार प्रस्ताव सादर करा पहा पुरस्काराचे स्वरूप कसे असणार आहे.

  • डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (75 हजार रुपये)
  • वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार ( प्रत्येकी आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक प्रती पन्नास हजार  रुपये)
  • जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक पन्नास हजार रुपये)
  • कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार (आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक, प्रत्येकी पन्नास हजार रुपये)
  • युवा शेतकरी पुरस्कार ( आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक प्रत्येकी तीस हजार रुपये.)
  • वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ( आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक असे तीस हजार रुपये)
  • उद्यान पंडित पुरस्कार (आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक प्रत्येकी 25 हजार रुपये)

तुमचा शेती पुरस्कार प्रस्ताव सादर करा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळे पुरस्कार.

सर्वसाधारण गट असेल तर अशा गटांकरिता प्रति जिल्हा अशा पद्धतीने 34 आणि आदिवासी गट जर असेल तर अशा  गटाकरिता प्रति विभाग एक याप्रमाणे सहा अशी एकूण 40 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

प्रत्येकी अकरा हजार  रुपये आणि आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक अधिकारी एक कर्मचारी याप्रमाणे आठ.

कृषी आयुक्तालय स्तरावरून एक अशी एकूण नऊ पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार या नऊ पुरस्कारांसाठी 20 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करायचे आहे.

तुम्ही जर शेती करत असाल आणि शेतीमध्ये तुम्ही अतिशय उत्तम कामगिरी केली असेल तर या पुरस्कारासाठी तुम्ही तुम्चाज प्रस्ताव सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.

15 फेब्रुवारी 2021 एक जी आर काढण्यात आलेला होता. या जी आर नुसार कृषी पुरस्काराच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

थोड्याफार प्रमाणामध्ये निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. शेती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांसाठी पुणे विभागातून युवा शेतकरी पुरस्कार या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी शेतकरी गट, संस्थांनी मार्गदर्शक सूचनेनुसार कृषी पुरस्कारासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 20 ऑगस्ट पर्यंत सादर करावा. विविध कृषी पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर शेती पुरस्कार प्रस्ताव सादर करून द्या. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *