गोविंदा पथकांना मिळणार शासकीय सुविधांचा लाभ दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना मिळेल शासकीय नोकरी इतर सुविधांना लाभ. पहा सविस्तर माहिती.
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केली आहे. प्रो गोविंदा स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल.
त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून विजेत्यांना शासकीय नोकरी देण्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना आता विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
पुढील योजना पण पहा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
गोविंदाचे नशीब उजळले दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना अनेक सुविधा.
महाराष्ट्र राज्य शासन दहिहंडी म्हणजेच गोविंदा हा उत्सव क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे लवकरच दहीहंडी हा उत्सव हा क्रीडा प्रकारात मोडला जाणार आहे.
त्यामुळे जे दहीहंडी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील त्यांना शासनाकडून बक्षीस तर मिळेलच शिवाय शासकीय नोकरी देखील मिळू शकते.
ज्या प्रकारे चीनमध्ये तसेच स्पेन या देशामध्ये पिरॅमिड म्हणून या खेळाचा समावेश केलेला आहे अगदी त्याच धर्तीवर आता दहीहंडी हा उत्सव क्रीडा प्रकारात आणला जाणार आहे.
दहीहंडी या खेळासाठी इतरही सुविधा महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.
इतरही सुविधा मिळणार.
जसे कि दही हंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे तयार करतांना दुर्घटना होऊन जर गोविंदाचा मृत्यू झला किंवा शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तर अशा गोविंदाना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
हे आर्थिक सहाय्य खालीलप्रमाणे असणार आहे.
- गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाला तर त्या गोविंदाच्या कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
- एखादा गोविंदा दहीहंडीच्या थरावरून पडला आणि त्याचे दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय किंवा कोणताही महत्वाचे शरीराचे दोन अवयव जर निकामी झाले तर त्या गोविंदास 7.50 एवढे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
- गोविंदाचा दही हंडी थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा त्यांच्या शरीराचा कोणताही एक अवयव निकामी झाला तर त्यांना 5 लाख एवढी रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाणार आहे.
- गोविंदाचा विमा देखील उतरविला जाणार होता परंतु उत्सव लगेच असल्याने यासाठी पुरेसा वेळ शासनास मिळाला नाही त्यामुळे विमा एवजी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
- यापुढे मात्र गोविंदाचा विमा उतरविला जाईल.
- हा आदेश केवळ २०२२ या वर्षासाठीच लागू राहणार आहे.
तुमचा जर गोविंदा पथकात सहभाग असेल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण आता गोविंदाना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.