नुकसान भरपाई १५ हजार मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.

नुकसान भरपाई १५ हजार मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १५ हजार मिळणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेवूयात या संबधी अधिक सविस्तर माहिती.

मागील जुलै महिन्यामध्ये म्हणजेच जुलै २०२२ मध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते.

नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना ५ हजार एवढी आर्थिक मदत मिळत होती ती मदत आता शासनाच्या वतीने वाढवून देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना आता ५ हजार रुपयांएवजी १५ एवढी आर्थिकमदत मिळणार असल्याचे सरकारने घोषित केले आहे. जुलै 2022 या वर्षामध्ये  शेतातील पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून म्हणजेच SDRF मधून सुधारित दराप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

पुढील योजना पण पहा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई १५ हजार रुपये.

शेतकऱ्यांना दिली जाणारी १५ हजार रुपये नुकसानभरपाई आर्थिक मदत प्रती हेक्टरी वाढीव मदत असून यापूर्वी २ हेक्टर मर्यादेत मदत केली जात होती.

मात्र आता हीच मदत 3 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिली जाणार आहे. म्हणजेच शासनाचे हेक्टर मर्यादा वाढवून दिलेली आहे.

आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रूपयांवरून १५ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच दिलासादायक बाब ठरणार आहे.

कोणताही शेतकरी अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही त्याचप्रमाणे हि  मदत वाटप करतांना कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येवू नाय अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

मदत लवकरात लवकर जमा व्हावी.

शेती करत असतांना शेतकरी बांधवाना विविध संकटाचा सामना करावा लगतो. त्यामध्ये महागाई असेल किंवा अजून इतर बाबी. शेतकऱ्यांना शेती करत असतांना सर्वात जास्त आर्थिक फटका बसतो तो नैसर्गिक संकटामुळे.

यासाठी शेतकरी बांधव आपल्या पिकांचा पिक विमा देखील काढत असतो. परतू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्य वेळी नुकसानभरपाईचे पैसे जमा न झाल्याने त्यांची तारांबळ उडते.

अशावेळी महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई १५ हजार देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरात लवकर हि रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी आशा करूयात.

अधिक माहितीसाठी खालील ऑडीओ ऐका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *