गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार

गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार

गणपती उत्सव २०२२ सुरु झाला असून गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही सार्वजनिक गणेश मंडळाचे सभासद असाल किंवा अध्यक्ष सचिव असाल तर हि तुमच्यासाठी खूपच महत्वाची बाब ठरणार आहे.

कारण विना परवानगी गणपती गणपती वर्गणी गोळा केली तर अडचण निर्माण होऊ शकते. गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी जी परवानगी हवी असते त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या ऑनलाई अर्जासंदर्भात सविस्तर मिती जाणून घेवूयात.

गणरायांच्या आगमनाची सर्वांनाच ओढ लागेलेली होती. केवळ शहरी भागामध्येच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणत गणपतीची स्थापना केली जाते.

लॉकडाऊन काळामध्ये गणेश उत्सव बंद करण्यात आला होता. परंतु या वर्षी म्हणजेच गणपती उत्सव २०२२ मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे.

गणपती वर्गणी गोळा करणे आता नियमाच्या आधीन

शहरी भागामध्ये कॉलोनीमध्ये तर ग्रामीण भागामध्ये गावामध्ये सामुहिक गणपती स्थापन केले जातात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना केली जाते आणि १० दिवस गणपतीची गणपतीची पूजा अर्चना केली जाते.

ज्या ठिकाणी गणरायाची मूर्तीची स्थापना केली जाते त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ आरतीसह इतर विविध सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमासाठी गणेश मंडळाच्या वतीने काही निधी जमा केला जातो ज्याला आपण वर्गणी असे म्हणतो. हि वर्गणी गोळा करून गणपती उत्सव दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

वर्गणी गोळा करतांना गणेश मंडळाच्या वतीने ज्या व्यक्तीकडून वर्गणी गोळा केली जाते त्यांना पावती दिली जात होती.

मात्र आता यापुढे गणपती उत्सवासाठी वर्गणी गोळा करायची असेल तर मात्र यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी आवश्यक असणार आहे.

गणपतीची आरती हवी आहे का pdf मध्ये मग पुढील लिंकवर क्लिक करा गणपती बाप्पाची आरती pdf मध्ये डाउनलोड करा.

गणपती वर्गणी गोळा करण्याचा परवाना काढण्यासाठी करावा लागणार अर्ज.

धर्मादाय आयुक्त यांची परवानगी काढल्याशिवाय गणपती उत्सवासाठी वर्गनी गोळा केली तर नक्कीच अशा गणेश मंडळाच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते.

आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी अर्ज कोठे आणि कसा करावा तर नकीच मित्रांनो याविषयी अगदी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी लागणारी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आता ऑनलाईन देखील काढता येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करवा कोणती कागदपत्रे अपलोड करावीज लागणार आहे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला गणपती वर्गणी गोळा करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे असल्याची खात्री करा.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत.

 • संबधित गणेश मंडळांनी संबधित संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरून त्यासोबत गणेश मंडळाचा ठराव.
 • ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र.
 • लाईट बिल.
 • सर्व सभासदांचे आधार व पॅन कार्ड प्रत.
 • मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास त्या परवानगीची प्रत.
 • मंडळाचे मागील वर्षीचे हिशोबपत्र.

वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्याआधी हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत याची खात्री करून घ्यावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करावी जेणे करून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

गणपती उत्सव २०२२ साठी वर्गणी गोळा करण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत.

तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलवर तुम्हाला The office of charity commissioner maharashtra म्हणजेच धर्मादाय आयुक्तालय महराष्ट्र राज्याची वेबसाईट शोधायची आहे. वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • मार्गदर्शन प्रणाली या बटनावर क्लिक करा.
 • नवीन युजर नोंदणी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी काही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे ती अशी नाव, मोबाईल नंबर, युजर नेम, पासवर्ड, लिंग, जन्मतारीख, इमारतीचे नाव किवा कार्यालयाचे नाव, मार्ग, काही विशिष्ट खून असेल तर त्या संदर्भातील माहिती ( Landmark ), पिन, तालुका, जिल्हा, गाव व कॅपचा कोड दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे.
 • वरील सर्व माहिती व्यवस्थितपणे थकल्यानंतर नोंदणी म्हणजेच रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
 • अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. हा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लोगिन करायचे आहे.
 • लॉगीन या बटनावर क्लिक करा.
 • युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.

असा करा ऑनलाईन अर्ज

एकदा का तुम्ही व्यवस्थितपणे लॉगीन झालात कि वर्गणी गोळा करण्यासाठी जी परवानगी हवी असते त्यासाठी ४१ c अंतर्गत अर्ज करू शकता. हा अर्ज खालीलप्रमाणे करावा लागतो.

 • लॉगीन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला Register an event (41 C ) असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही वरील पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक ऑनलाईन अर्ज तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
 • या अर्जामध्ये कोणकोणती माहिती भरावी लागते या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडीओ तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा जेणे करून तुम्ही वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी मिळवू शकाल.

गणपती उत्सव २०२२ साठी वर्गणी गोळा करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *