crop insurance app संदर्भात माहिती जाणून घेवूयात. तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर त्याची सूचना पिक विमा कंपनीस कशी द्यावी. या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
अवकाळी पावसामुळे गहू हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जोरात वारा सुटल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून गहू शेतात अडवा झालेला आहे. अशा वेळी तुम्ही पिक विमा कंपनीस नुकसान भरपाईची सूचना द्या.
जेणे करून तुमच्या शेतातील पिकांचे देखील नुकसान झाले असेल तर तुम्हाला यासाठी पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकते.
crop insurance app चा उपयोग करून पिक नुकसानीची सूचना विमा कंपनीस कशी दिली जाते या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची नोंद पिक विमा कंपनीकडे करू शकता.
डिजिटल डीजी टीमने अशा एका शेतकऱ्याच्या शेतास भेट दिली ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील मका पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते.
सदरील शेतकरी बांधवास तालुक्याच्या टिकाणी जाने किंवा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर पिक नुकसानीची सूचना देणे शक्य नव्हते.
अशावेळी त्याच शेतकरी बांधवांच्या स्मार्ट मोबाईल मधील क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app वापरून शेतकरी बांधवांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस कशा पद्धतीने दिली गेली या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पुढील माहिती पण कामाची आहे. पिक नुकसानभरपाई 2022 बँकेत जमा होण्यास सुरुवात
crop insurance app वापरून पिक विमा कंपनीस नुकसानीची माहिती कळवा.
जेणे करून तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची नोंद तुम्ही स्वतः पिक विमा कंपनीस सादर करू शकता आणि याबदल्यात तुम्हाला पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकेल.
पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीची सूचना कंपनीस कळविणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवानी पिक विमा काढलेला असेल तर पिक विमा पावती किंवा पॉलिसी क्रमांक शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे.
शेतकरी बंधुंनो चला तर आता जाणून घेवूयात कि crop insurance app वापरून शेतातील नुकसानग्रस्त पिकांची नोंद कशी करावी.
क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app वापरण्याची पद्दत.
- सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app ओपन करा.
- हे ॲप ओपन केल्यावर अनेक पर्याय दिसतील त्यापैकी continue without login या पर्यायावर क्लिक करा.
- त्यांतर crop loss हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- crop loss intimation या पर्यायावर क्लिक करा.
- आता शेतकरी बांधवाना त्यांचा सक्रीय असलेला १० अंकी मोबाईल नंबर चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि Sent OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- शेतकरी बांधवाना आता पुढील माहिती भाराव्याचिया आहे. १) सीजन या चौकटीमध्ये खरीप हा पर्याय निवडा. २) Year या चौकटीमध्ये वर्ष निवडा म्हणजेच २०२२ हा पर्याय निवडावा. ३) scheme या चौकटीमध्ये pradhan mantri fasal bima yojana हा पर्याय निवडा. ४) स्टेट मध्ये महराष्ट्र सिलेक्ट करा.
- सर्वात शेवटी Select हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- from where did you enroll म्हणजेच हा अर्ज तुम्ही कोणत्या ठिकाणी भरलेला आहे तो पर्याय दिलेल्या यादीतून निवडावा जसे कि Bank, csc, farmer online, intermediary.
- Do you have a application or policy number असा एक पर्याय दिसेल. शेतकऱ्यांकडे अर्ज भरतांना जर पिक विमा पावती असेल तर या पर्यायासमोरील बटन ऑन करा.
- आता शेतकरी बांधवाना त्यांचा पॉलिसी क्रमांक दिसेल त्यावर क्लिक करा.
- पॉलिसी क्रमांकावर क्लिक करताच शेतकऱ्यांनी भरलेली सर्व पिक विमा माहिती या ठिकाणी दिसेल. ज्या पिकांचा पिक विमा काढलेला आहे त्या सर्व पिकांची नावे दिसतील. ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यावर टच करा.
पिक नुकसानीचा रिपोर्ट करा.
वरील माहिती भरल्यानंतर आता शेतकऱ्यांना Report Incidence म्हणजेच नुकसानग्रस्त पिकांचा रिपोर्ट करायचा आहे. मोबाईल स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल त्यामध्ये खालील माहिती भरायची आहे.
- Type of Incidence मध्ये विविध पर्याय तुम्हाल दिसतील. ज्या कारणास्तव नुकसान झाले असेल ते कारण निवडावे. जास्त पावसाने नुकसान झाले असेल तर excess rainfall हा पर्याय निवडावा.
- त्यांनतर तारीख टाका.
- Status of crop at the time of incidence असा एक पर्याय दिसेल म्हजेच पिकांची स्थिती काय आहे हि दिल्याया पर्यायातून निवडावी. Standing crop, Harvested, cut and spread bundled condition of drying.
- पिक नुकसानीची टक्केवारी टाकावी.
- रिमार्कमध्ये शेतकरी त्यांची सूचना थोडक्यात टाकू शकतात.
- फोटो अपलोड करावा.
- व्हिडीओ अपलोड करावा.
- सर्वात शेवटी सबमिट या पर्यायावर टच करून अर्ज सादर करा.
डॉकेट आयडी वापरून स्टेट्स चेक करा.
जसे हि तुम्ही हा अर्ज सादर कराल त्यावेळी एक डॉकेट आयडी तुम्हाला मिळेल पुढील कार्यवाहीसाठी हा एक डॉकेट आयडी सांभाळून ठेवा जेणे करून तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती कळेल.
आता जाणून घेवूयात कि क्रॉप इन्सुरन्स क्लेम स्टेट्स कसे पाहावे crop insurance claim status
क्रॉप इन्सुरन्स क्लेम स्टेट्स पाहण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- परत एकदा तुमच्या मोबाइल मधील क्रॉप इन्सुरन्स ॲप ओपन करा.
- continue without login या पर्यायावर टच करा.
- crop loss या पर्यायावर टच करा.
- त्यानंतर crop loss status या पर्यायावर टच करा.
- जो डॉकेट आयडी तुमच्याकडे आहे तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
- जसे हि तुम्ही तुमचा डॉकेट आयडी दिलेल्या चौकटीमध्ये टाकाल त्यावेळी तुम्ही पिक विमा कंपनीस सादर केलेल्या पिक नुकसानीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. यामध्ये तुमच्या अर्जाचे स्टेट्स पेंडिंग आहे किंवा approve झाले आहे हे देखील कळेल.
तर अशा पद्धतीने शेतकरी त्यांच्या शेतीतील नुकसानग्रस्त crop insurance app वापरून करू शकतात. हि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app हे ॲप्लिकेशन वापरून शेतकरी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती पिक विमा कंपनीस देवू शकतात.
क्रॉप इन्सुरन्स ॲप द्वारे पिक नुकसानीची माहिती दिल्यावर एक डॉकेट आयडी मिळतो त्या त्याद्वारे शेतकरी त्यांनी सादर केलेल्या पिक नुकसान सूचनेचे स्टेट्स चेक करू शकतात.
शेतकरी स्वतः हे ॲप वापरून नुकसानग्रस्त पिकांची सूचना ऑनलाईन देवू शकतात किंवा शेतकरी हे ॲप वापरण्यासाठी इतरांची मदत देखील घेवू शकतात.