शंखी गोगलगाय नुकसानभरपाई shankhi gogalgai pik nuksan bharpai संदर्भातील नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
शंखी गोगलगायीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आता लवकरच अनुदान मिळणार आहे. यासाठी शासनाने ९८ कोटी ५८ लाख एवढी मदत वितरीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये शंखी गोगलगायीमुले अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले विशेषतः बीड जिल्हा लातूर जिल्हा व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यामध्ये शंखी गोगलगायीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
यामुळे आता लवकरच अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच शंखी गोगलगाय नुकसानभरपाई अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.
पुढील लेख पण वाचा नुकसान भरपाई १५ हजार मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.
शंखी गोगलगाय नुकसानभरपाई shankhi gogalgai pik nuksan bharpai
शंखी गोगलगायीमुळे ज्या शेतकरी बांधवाच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना वाढीव दराने हि मदत दिली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून हि मदत दिली जाते.
राज्यात शंखी गोगलगायीमुळे पिक नुकसान होणाऱ्यांची संख्या 1 लाख 18 हजार 996 एवढी आहे. या बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मंजूर मदत ताबडतोब वितरित करावी असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आले आहेत.
ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नैसर्गिक अप्पातीमुळे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
खालील प्रमाणे दिली जाणार शंखी गोगलगाय नुकसानभरपाई
शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत दिली जाणार आहे ती खालील पद्धतीने दिली जाणार आहे.
- जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये.
- बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरुन 27 हजार रुपये
- बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये
वरील वाढीव दराप्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यापूर्वी केवळ २ हेक्टर मर्यादेत हि मदत शेतकऱ्यांना दिली जात होती ती क्षेत्र मर्यादा वाढवून आता ३ हेक्टर एवढी करण्यात आलेली आहे.
शासन निर्णय GR निर्गमित
सदरील मदतीचा निधी हा संबधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मदतीची हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.
ज्या लाभार्थ्यांना हि मदत दिली जाणार आहे त्यांच्या याद्या संबधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्द करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.
शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसान संदर्भात शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
२०२२ या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान शंखी गोगलगाय या प्राण्यामुळे झाले असेल अशा शेतकऱ्यांना शासनाकडून शंखी गोगलगाय नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
शंखी गोगलगाय नुकसानभरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे.
होय शंखी गोगलगाय नुकसानभरपाईचा जी आर म्हणजेच शासन निर्णय दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे.
शंखी गोगलगाय नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे ती वाचून घ्या म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल.