Maha us nondani app महा ऊस नोंदणी ॲप द्वारे करा ऊसाची नोंद

Maha us nondani app महा ऊस नोंदणी ॲप द्वारे करा ऊसाची नोंद

जाणून घ्या Maha us nondani app संदर्भातील सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आता त्यांच्या शेतातील ऊसाची नोंदणी अगदी त्यांच्या शेतातून करू शकतात. महा ऊस नोंदणी ॲप Maha us nondani app द्वारे शेतकरी त्यांच्या शेतातील उसाची नोंदणी हव्या त्या साखर कारखान्यास करू शकतात.

ऊसाची नोंदणी करण्यासाठी महा ऊस नोंदणी ॲप Maha us nondani app कसे इंस्टॉल करावे, याचा वापर कसा करावा, कोणती माहिती भरावी या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घ्या.

केवळ माहितीच नव्हे तर महा ऊस नोंदणी ॲप Maha us nondani app वर उसाची नोंदणी कशी करावी या संदर्भातील एक व्हिडीओ देखील या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे. तो व्हिडीओ देखील पहा म्हणजे या ॲपच्या वापरासंदर्भातील माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल.

पुढील लेख पण वाचा crop insurance app वापरून विमा कंपनीस नुकसानीची माहिती कळवा

Maha us nondani app महा ऊस नोंदणी ॲप इंस्टॉल करा.

 • तुमच्याकडे android smart phone असेल तर त्यामधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
 • गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये Maha us nondani app असे टाईप करा.
 • Maha us nondani app इंस्टॉल करा.

हि तर झाली महा ऊस नोंदणी ॲप इंस्टॉल करण्याची पद्धत. आता पुढील प्रोसेस अगदी सोपी आहे. पुढील जी प्रोसेस आहे ती म्हणजे महा ऊस नोंदणी ॲपवर ऊसाची ऑनलाईन नोंदणी करणे. आता खालील पद्धतीचा अवलंब करा.

खालील माहिती भरा Maha us nondani app मध्ये.

 • महा ऊस नोंदणी ॲप ओपन करा.
 • ऊस क्षेत्राची माहिती भरा असे बटन दिसेल त्यावर टच करा.
 • त्यानंतर एक फॉर्म मोबाईल स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये शेतकरी बांधवाना मोबाईल नंबर, आधार नंबर, शेतकऱ्यांचे पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव हि माहिती भरावयाची आहे.
 • वरील सर्व माहिती सादर केल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करा.
 • पुढे या बटनावर क्लिक केल्यावर अर्जदारास त्यांचा तालुका गाव, तालुका आणि जिल्हा निवडायचा आहे.
 • शेत जमिनीचा सर्वे नंबर टाका आणि पुढे या बटनावर टच करा.

ऊस लागवडीची माहिती टाका.

आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील ऊस लागवडीची माहिती व्यवस्थित टाकायची आहे. ती माहिती खालीलप्रमाणे आहे.

 • लागवड प्रकार/ हंगाम प्रकार – यामध्ये आडसाली, पूर्व हंगामी, सुरु व खोडवा असे प्रकार दिसतील त्यापैकी एक प्रकार निवडा.
 • ऊसाची जात निवडा.
 • ज्या दिवसी ऊसाची लागवड करण्यात आली तो दिनांक टाका.
 • किती जमीन क्षेत्रावर ऊसाची लागवड केली ते क्षेत्र दिलेल्या चौकटीमध्ये टाकून पुढे या बटनावर क्लिक करा.
 • त्यानंतर ज्या साखर कारखान्यास ऊस द्यायचा आहे तो साखर कारखाना दिलेल्या यादीतून निवडा.
 • त्यानंतर पुढे या बटनावर टच करा.
 • जसेहि तुम्ही पुढे या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक स्वयंघोषणापत्र तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल ते वाचून घ्या आणि सर्वात शेवटी ऊस क्षेत्राची माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करा.
 • आपण सादर केलेल्या ऊस क्षेत्राची माहिती आपण निवड केलेल्या साखर कारखान्यांना कळविली आहे असा संदेश तुम्हाला दिसेल.

अशा पद्धतीने ऊसाची Maha us nondani app वापरून नोंदणी करता येते.महा ऊस नोंदणी ॲप संदर्भातील अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

महा ऊस नोंदणी ॲपचा उपयोग कशासाठी करता येतो?

शेतातील ऊस हव्या त्या कारखान्यास अगदी मोबाईलवरून नोंदविण्यासाठी करता येतो.

महा ऊस नोंदणी ॲपचा उपयोग कसा करावा?

या ॲपचा उपयोग कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच व्हिडीओ देखील या लेखामध्ये देण्यात आलेला आहे. व्हिडीओ बघून देखील शेतकरी त्यांच्या ऊसाची नोंद कशी करावी या संदर्भातील माहिती मिळवू शकतात.

Maha us nondni app इंस्टॉल कोठून आणि कसे करावे.

महा ऊस नोंदणी ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून हे ॲप इंस्टॉल कसे करावे या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे ती बघावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *