जाणून घेवूयात सहल मुंबईची मोबाईल ॲप Sahal Mumbaichi mobile app संदर्भातील संपूर्ण माहिती. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सहल मुंबईची मोबाईल ॲप Sahal Mumbaichi mobile app लाँच करण्यात आले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून हे मोबाईल ॲप मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
प्रत्येकाला कधी ना कधी एकदा तरी मुंबईला फिरायला जाण्याची हौस असते. परंतु मुंबई शहराची माहिती नसल्याने अनेकांना मुंबईमध्ये अवघडल्यासारखे वाटते.
पुढील लेख पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
Sahal Mumbaichi mobile app इंस्टाल करण्यास सोपे.
विशेषतः आपल्या शेतकरी बांधवाना मुंबईमधील पर्यटन स्थळांची माहिती नसण्याची शक्यता असल्याने खासकरून त्यांना या सहल मुंबईची मोबाईल ॲप Sahal Mumbaichi mobile app ची खूप मोठी मदत मिळणार आहे.
10.04 MB साईजचे हे मोबाईल ॲप्लिकेशन असून वापरण्यास अगदी सोपे आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती अगदी मुद्देसूदपणे दिल्याने वापरकर्त्यास अधिक सोपे जाते.
चला तर जाणून घेवूयात सहल मुंबईची मोबाईल ॲप Sahal Mumbaichi mobile app मोबाईलमध्ये इंस्टाल कसे करावे आणि याचा उपयोग कसा करावा.
या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही सहल मुंबईची मोबाईल ॲप Sahal Mumbaichi mobile app तुमच्या मोबाईल मध्ये अगदी काही मिनिटामध्ये इंस्टाल करू शकता.
सहल मुंबईची मोबाईल ॲप Sahal Mumbaichi mobile app इंस्टाल करण्याची पद्दत.
- गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
- सर्च मध्ये Sahal Mumbaichi mobile app असे टाईप करा.
- सहल मुंबईची मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल करून घ्या.
एकदा का हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल झाले कि मग पुढील प्रोसेस अगदी सोपी आहे. हे ॲप वापरण्यास खूपच सोपे आहे.
Flipbook चा उपयोग करून अत्यंत आकर्षकपणे मुंबई शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे.
केवळ माहितीच नव्हे तर त्या पर्यटनस्थळासंदर्भातील व्हिडीओ देखील त्याच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने संबधित पर्यटनस्थळाविषयी माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते.
पुढील लेख पण वाचा नवीन विहीर अनुदान योजना अर्ज सुरु 2.50 लाख अनुदान मिळणार
ज्या पर्यटनस्थळाला तुम्ही भेट देणार आहात त्या ठिकाण पासून किती अंतरावर कोणत्या सुविधा आहेत त्या खालीलप्रमाणे
- सार्वजनिक सौचालय.
- दवाखाना.
- पार्किंग.
- हॉटेल्स.
- पोलीस स्टेशन.
या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी गुगल मॅप लोकेशनसहित दिल्याने पर्यटकाला खूपच मदत होते.
पुढील लेख पण वाचा मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता हे आहे मोठे कारण.
सहल मुंबईची मोबाईल ॲपमध्ये महत्वाचे कॉन्टॅक्टस्
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोबाईल ॲपमध्ये महत्वाची कॉन्टॅक्टस् नंबर दिलेले आहेत. ज्यामुळे अगदी एका क्लिकवर तुम्ही कोणत्याही विभागाला कॉल करू शकता. ती कॉन्टॅक्टस् नंबर खालीलप्रमाणे
- नागरिकांसाठी मदत केंद्र.
- लहानमुल हेल्पलाईन नंबर.
- महिला हेल्प नंबर.
- गुन्हा प्रतिबंधक.
- मदत आणि बचाव.
- जिल्हा नियंत्रण कक्ष.
- महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष.
इतरही विविध माहिती या मोबाईल ॲपमध्ये दिलेली आहे त्यामुळे नागरिकांना विशेषतः आपल्या शेतकरी बांधवाना याचा फायदा होणार आहे.
त्यामुळे एकदा तरी जीवाची मुंबई करायची असेल तर या मोबाईल ॲपची खूप मोठी मदत होणार आहे. या ॲप संदर्भातील माहितीचा खालील व्हिडीओ पहा.
अधिक माहितीसाठी महासंवाद या वेबसाईटला भेट द्या.
फिरायला जाताहेत तर पर्यटन माहिती आवश्यक.
कोणत्याही ठिकाणी तुम्ही फिरायला जात असाल तर त्या शहरासंबधी किंवा पर्यटनस्थळाविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्हाला जर पर्यटनस्थळाविषयी पूर्ण माहिती नसेल तर मात्र मोठ्या प्रमाणत तुम्हाला मानसिक आणि आर्थिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येते नाही.
दैनंदिन धाकाधुकीला कंटाळून व्यक्ती फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. अशावेळी आपल्याकडे पर्यटनस्थळाविषयी तर अगदी अचूकपणे आपल्याला हवे ते ठिकाण अगदी कमी वेळेत गाठता येते.
परंतु माहिती नसेल तर कधी कधी आपण एखाद्या महत्वाच्या ठिकाणच्या जवळ जावून देखील त्या ठिकाणी भेट देवू शकत नाही.
नंतर कळते कि आपण तर अमुक एका ठिकाणच्या अगदी जवळून गेलो तरी आपल्याला हे कसे माहिती नव्हते आणि मग पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते.
त्याचमुळे मोबाईल ॲप पर्यटकांस खूप मदत करेल यात शंका नाही.
मुंबई शहरातील विविध पर्यटन स्थळांची माहिती मिळविण्यासाठी सहल मुंबईची मोबाईल ॲपचा उपयोग केला जातो.
Sahal Mumbaichi mobile app गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्या ठिकाणाहून हे ॲप मोबाईलमध्ये इंस्टाल करून घ्या.
सहल मुंबईची मोबाईल ॲपचा उपयोग कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ या ठिकाणी दिलेला आहे तो बघा.