देशामध्ये 5g network launch नेटवर्कचा मोदींच्या हस्ते राष्ट्रव्यापी शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.
इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही असा सल्ला देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुम म्हणून रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते.
हे पण वाचा अतिवृष्टी नुकसान वाढीव निधी आला बघा तुमचा जिल्हा आहे का यादीमध्ये
5g network launch नेटवर्कमुळे होणार क्रांती.
या क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फाईव्ह जी नेटवर्कमुळे माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठा अमुलाग्र बदल होणार आहे. इंटरनेट स्पीडमुळे अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल होणार असला तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल होणार आहे.
5g network launch नेटवर्कमुळे कामाची गती वाढणार.
मोबाईलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करावा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वत:च्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
फाईव्ह जी नेटवर्कमुळे ऑनलाईन कामाच्या प्रक्रियेस गती मिळणार आहे. शिवाय इंटरनेट स्पीडमुळे कोणतीही फाईल अगदी पटकन अपलोड किंवा डाउनलोड करता येणार आहे.
असे असले तरी याचे तोटे देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फाईव्ह जी नेटवर्क तंत्रज्ञानाचा उपयोग अतिशय योग्य पद्धतीने आणि कामासाठीच करावा.
जेणे करून त्याच्या दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
पुढील लेख पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
ग्रामीण भागातील नागरिकांना होणार लाभ.
शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांकडे खूप मोठ्या प्रमाणत स्मार्ट फोनचा वापर वाढलेला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती संबधित माहिती अगदी काही मिनिटामध्ये या तंत्रज्ञानामुळे होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी या फाईव्ह जी नेटवर्क तंत्रज्ञानाचा उपयोग शेतातील प्रगतीसाठी करावा.
लहान मुलांसाठी इंटरनेट वापर मर्यादित हवा. मुले मोबाईलवर काय बघतात याकडे पालकांचे लक्ष हवे. मुलांना जी माहिती हवी आहे तेवढ्या पुरताच मोबाईल मुलांना हाताळण्यासाठी द्यावा.
त्यामुळेच इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.