पशुपालकांना मिळणार 5 लाख रुपये असा करा ऑनलाईन अर्ज

पशुपालकांना मिळणार 5 लाख रुपये असा करा ऑनलाईन अर्ज

तुम्ही दुग्धव्यवसाय करत असाल किंवा पशुपालक असाल तर अशा पशुपालकांना मिळणार 5 लाख रुपये मिळविण्याची नामी संधी शासनाच्या वतीने मिळणार आहे.

लम्पी रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन प्रभावित झालेले आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा उभारी घेण्याची घेण्याची संधी मिळणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांकडे गाई आहेत म्हणजेच ते दुग्धव्यवसाय करतात अशांसाठी गोपाल रत्न पुरस्कार rashtriya gopal ratna puraskar 2022 जिंकण्याची संधी मिळणार आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जसे कि अर्ज कोठे करावा, कसा करावा या माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा आणि संपूर्ण डीटेल्स पहा.

तीन श्रेणीमध्ये पशुपालकांना मिळणार 5 लाख व इतर पुरस्कार

हा जो गोपाल रत्न पुरस्कार पात्र व्यक्तीना दिला जाणार आहे तो तीन श्रेणीमध्ये दिला जाणार आहे. प्रत्येक श्रेणीमधून तीन याप्रमाणे एकूण नऊ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या श्रेणी खालीलप्रमाणे

  • श्रेणी १ – असे शेतकरी किंवा असे पशुपालक ज्यांच्याकडे गाईंच्या ५० जाती आणि म्हशींच्या १७ मान्यताप्राप्त जाती असणे गरजेचे आहे.
  • दुसरी श्रेणी २ – या श्रेणीमध्ये केंद्रशासित प्रदेश, राज्य, राज्य दूध महासंघ, पशुधन विकास मंडळ, स्वयंसेवी संस्था आणि इतर खासगी संस्थांचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ ज्याला आपण AI Technicians असे म्हणतो हे या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार आहेत. मात्र या श्रेणीमध्ये अर्ज करतांना अर्जदाराकडे ९० दिवसाचे कृत्रिम रेतन प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • श्रेणी ३ – तिसऱ्या श्रेणीमध्ये दूध उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था त्याचप्रमाणे गावपातळीवर स्थापन केलेल्या दुग्ध व्यवसायात गुंतलेली आणि सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेली कंपनी देखील अर्ज करू शकते. गाव पातळीवरील संस्थांसाठी प्रतिदिवस १०० लिटर दुध संकलन करणे व संस्थेमध्ये किमान ५० सदस्य असणे गरजेचे आहे.

पुरस्काराचे स्वरूप खालीलप्रमाणे.

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गोपाल रत्न पुरस्कारासाठी rashtriya gopal ratna puraskar 2022 किती रक्कम मिळणार आहे हा होय.

या पुरस्कारासाठी खालीलप्रमाणे रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.

  • पहिल्या क्रमांकासाठी ५ लाख रुपये.
  • दुसऱ्या पुरस्कारासाठी ३ लाख रुपये.
  • तिसऱ्या पुरस्कारासाठी २ लाख रुपये.

या पुरस्कारांसोबत गुणवत्ता प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पशुपालक असाल आणि वरील नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची नामी संधी मिळणार आहे.

गोपाल रत्न पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा gopal ratna puraskar online application या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा जेणे करून अर्ज करण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.

अधिकृत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजना संदर्भातील काही प्रश्न

५ लाख रुपये मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा?

केंद्र सरकारच्या वतीने ५ लाख, ३ लाख आणि २ लाख अशी रक्कम मिळणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगणार आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या लेखामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच प्रमाणे एक व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ पाहून देखील तुम्ही ऑनलाईन अर्जाविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

१० ऑक्टोबर २०२२ हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. अर्थात हि तारीख वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही परंतु शेवट दिनांकाची वाट न पाहता अर्जदारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन करून द्यावेत.

अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा?

तालुक्यातील पशुसंवर्धन कार्यालयास अधिक माहितीसाठी संपर्क साधा. त्या ठिकाणी देखील तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती चांगल्या पद्धतीने मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *