जाणून घ्या सोयाबीन पिक नुकसान soyabean nuksan bharpai झाले असेल तर कशी द्यावी लागते पिक विमा कंपनीस सूचना. जेणे करून तुम्हाला soyabean nuksan bharpai पिक नुकसान भरपाई मिळू शकेल.
सध्या महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
सोयाबीन पिकांची आता सोंगणी सुरु झालेली आहे. काही ठिकाणी सोयाबीन सोंगणी करून सोयाबीनची गंजी घातलेल्या आहेत. अशावेळी पडत असलेल्या या पावसामुळे शेतातील सोयाबीन ओले होत आहे. यामुळे सोयाबीन पिक नुकसान होत आहे.
काही ठिकाणी सोयाबीन पिक शेतात न सोंगनी करताच उभे आहे. सोयाबीन जास्त वाळल्यामुळे शेंगामधील दाणे फुटत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास पावसामुळे सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे.
हा लेख पण वाचा Pik nuksan bharpai yadi 2022 पिक नुकसान भरपाई यादी यादी पहा
सोयाबीन पिक नुकसान झाले असेल तर लगेच करा क्लेम
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे जेणे करून शेतातील पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकेल.
शेतकरी बंधुनो लक्षात घ्या कि तुम्ही जर पिकांचा पिक विमा काढलेला असेल तर पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची माहिती कळविणे आवश्यक आहे.
कारण असे न केल्यास तुम्हाला पिक विमा मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पिक विमा कंपनीस सूचना देणे गरजेचे आहे.
त्यामुळे आताच्या पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकरी बांधवानी लगेच पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस देणे गरजेचे आहे.
तीन पद्धतीने कालवा सोयाबीन पिक नुकसान माहिती.
पिक नुकसानीची सूचना म्हणजेच crop loss intimation पिक विमा कंपनीस कशी द्यावी या संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
प्रमुख्याने तीन पद्धतीने शेतकरी त्यांच्या शेतातील पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस कळवू शकतात.
- कंपनीस अर्ज करून लेखी कळविणे.
- कंपनीच्या टोल फ्री नंबरवर फोन करून कळविणे.
- crop insurance application ॲपच्या सहाय्याने पिक नुकसानीची सूचना देणे.
वरील पद्धतीने शेतकरी त्यांच्या शेतातील पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस कळवू शकतात.
क्रॉप इन्सुरन्स ॲपच्या सहाय्यने सूचना देणे अधिक सोपे.
वरील पर्यायांपैकी सर्वात सोपा पर्याय म्हणजे crop insurance application हा होय. हा पर्याय वापरून शेतकरी त्यांच्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यास त्या संदर्भात पिक विमा कंपनीस सूचना देवू शकतात म्हणजेच crop loss intimation देवू शकतात.
लेखी सूचना देण्यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा कार्यालयास जाऊन अर्ज द्यावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे crop insurance application ॲपच्या सहाय्याने ऑनलाईन सूचना देणे हा पर्याय अगदी सोपा आहे.
सोयाबीन पिक नुकसान संदर्भातील माहिती crop insurance application ॲपच्या सहाय्याने कशी द्यावी या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा आणि त्या पद्धतीने माहिती भरून द्या.
क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप crop insurance mobil application च्या सहाय्याने सोयाबीन पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस देता येते.
सोयाबीन पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस देण्यासाठी crop insurance mobil application चा उपयोग कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या लेखामधील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा म्हणजे तुम्हाला सोयाबीन पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस देता येईल.
पिकांची नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देणे गरजेचे आहे.