शेत रस्त्यासाठी 24 लाख रुपये मिळणार मंत्र्याची माहिती

शेत रस्त्यासाठी 24 लाख रुपये मिळणार मंत्र्याची माहिती

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेत रस्त्यासाठी 24 लाख रुपये मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. लवकरच हि योजना अमलात आणली जाणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिलेली आहे.

शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतात जाण्यासाठी शेत रस्ता shet rasta होय. शेतात जाण्यासाठी शेत रस्ता नसेल तर तुम्ही कितीही चांगले उत्पादन घेतले आणि ते योग्य वेळी बाजारात गेले नाही तर त्याला चांगला भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागतो.

हीच बाब अधोरेखित करून मातोश्री योजना सुरु करण्यात आली होती. शेतात जाण्यासाठी १ किमी रस्त्यासाठी १ लाख रुपये शासनाकडून मिळत होते.

परंतु आता यापुढे शेत रस्ता निर्मितीसाठी १ लाख रुपये नव्हे तर तब्बल २४ लाख रुपये मिळणार आहेत. या पैशातून शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता देखील बनविला जाणार असल्याची माहिती रोजगार हमी फलोत्पादन मंत्री यांनी दिली आहे.

पुढील माहिती पण कामाची आहे पाणंद शेत रस्ता निर्मितीसाठी मिळणार जेसीबी महाराजस्व अभियान

शेत रस्त्यासाठी मिळशेत रस्त्यासाठी 24 लाख रुपये मिळणार पहा संपूर्ण माहिती

यापुढे एकाही जाचक अटीमुळे शेतकरी किंवा शेतमजूर शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची नियमावली तयार केली आहे.

प्रत्येकाला शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता हवा तर माझ्या शेतकरी बांधवाला देखील त्यांच्या शेतात जायला पक्का रस्ता का नको म्हणून एका किलोमीटरला ज्या ठिकाणी एक लाख रुपये निधी होता तो आता 24 लाख रुपये करण्यात आलेला आहे. अशी माहिती रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपन भुमरे यांनी दिली आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांचा शेत रस्त्याचा प्रश्न कायम निकाली लागणार आहे.

यातून शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.

पुढील योजना पण बघा. मातोश्री शेत रस्ते योजना शेतात जाण्यासाठी रस्ते मिळणार जी आर आला

शेतात वाहने नेणे होणार सोपे.

ज्या शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता land road नाही अशा शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे. शेतात जाण्यासाठी पक्का आणि दर्जेदार रस्ता जर मिळाला तर नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते.

ग्रामीण भागामध्ये शेत रस्ता प्रकरणी वाद विवाद होत असतात. शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता जर शेतकऱ्यांना मिळाला तर शेत मशागतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहने अगदी सहजपणे शेतामध्ये येईल आणि यामुळे शेत मशागतीची त्याचप्रमाणे माल वाहतुकीची सुविधा शेतकऱ्यांना मिळेल.

हि माहिती आपल्या शेतकरी बांधवाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या संदर्भात माहिती मिळेल.

शेत रस्ता संदर्भातील खालील काही प्रश्ने बघा ज्यामुळे तुम्हाला रस्ता मिळविण्यासाठी मदत होऊ शकेल.

शेतात जाण्यासाठी नवीन शेत रस्ता मिळेल का?

नक्कीच होय, शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर शासनाच्या वतीने रस्ता निर्माण करून दिला जातो.

शेतात जाणारा पूर्वीचा रस्ता अडविला तर काय करता येईल?

शेतात जाण्यासाठी अगोदरच रस्ता असेल आणि तो अडविला असेल तर अर्जदारांनी सर्वात अगोदर ग्राम पंचायत कार्यालयात तक्रार द्यावी. ग्रामपंचायत कडून प्रश्न मिटत नसेल तर ग्रामसेवक तहसील कार्यालयात तसा अहवाल सादर करत. त्यानंतर तहसीलदार स्वतः रस्त्याची पाहणी करण्यासाठी येतात आणि सर्व बाबींचा विचार करून रस्ता निर्माण करून देतात. मात्र तहसीलदार यांच्या निर्णयाला देखील आवाहन दिले जावू शकते.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता निर्माण करून द्यावा या संदर्भातील जी आर आहे का?

होय. या लेखामध्ये मातोश्री शेत रस्ते योजना संदर्भातील माहिती दिलेली आहे ती माहिती वाचा. यामध्ये शासन निर्णय म्हणजेच जी.आर संदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *