अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 संदर्भातील माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.
अतिवृष्टी व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ज्याला इनपुट सबसिडी असे देखील म्हटले जाते.
तर या इनपुट सबसिडी स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते हे आपणाला माहित असेलच.
महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यामध्ये शेत पिकांचे नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसान करिता मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता.
पुढील माहिती पण पहा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी आला पहा यामध्ये तुमचा जिल्हा आहे का
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 साठी पहा किती निधी आला.
यानुसार राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीच्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते.
त्यानुसार बाबीत त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान व शेतजमीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण 3501.1 कोटी रुपये 98.58 कोटी व रुपये 335.17 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त झाले असेल तर त्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.
परंतु काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते.
खालील जिल्ह्यांसाठी विशेष बाब म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 मिळणार
शासन निर्णय महसूल व वन विभागामध्ये अतिवृष्टी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास अशा नुकसानी फुटी विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव पाठवण्याची तरतूद आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
या तरतुदीनुसार चालू हंगामामध्ये विभागीय आयुक्त औरंगाबाद विभागीय आयुक्त अमरावती व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून अतिवृष्टीच्या नकाशा बाहेरील पावसामुळे ते 30 टक्के पेक्षा जास्त पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत शासनास प्रस्ताव प्राप्त झालेले होते.
हे प्रस्ताव निर्णयार्थ माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीच्या दिनांक 29.9.2022 रोजी झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. मंत्रिमंडळ उप समितीने चालू हंगामा करता अतिवृष्टीच्या नकाशा बाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानेकरिता विशेष बाब म्हणून विहित दराने मदत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती.
जिल्ह्याची यादी पहा.
ज्या लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे त्या लाभार्थ्यांची यादी मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
ज्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
या अतिवृष्टी नुकसानभरपाईमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार त्यामुळे नक्कीच हा निधी शेतकऱ्यांसाठी आनंद घेवून येईल यात शंका नाही.
या संदर्भात खालील प्रश्ने पहा.
काल म्हणजेच दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या जी आर सोबत जिल्ह्याची यादी दिलेली आहे. या लेखामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
आधार प्रमाणीकरण केल्यावर अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी CSC सेंटरला भेट द्यावी.