ई पिक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून अतिवृष्टी मदत 2022 सरसकट मिळणार आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानभरपाईची मदत लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
जे शेतकरी पिक पाहणी पासून वंचित राहिले आहेत त्यांनाही सरसकट मदत देऊन ही पिक पाहण्याची अट शिथिल केली जाईल जाणार आहे.
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा अतिवृष्टी मदत 2022 सरसकट मिळणार
पिक विमा संदर्भात लवकरच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येईल तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यात येईल असे देखील मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
या संदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानीई पिक पाहणी केली नसेल त्यांना आता दिलासा मिळालेला आहे. जरी पिक नुकसान भरपाईसाठी हि अट शिथिल करण्यात आली असली तरी शेतातील पिकांची ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे.
अतिवृष्टी मदत 2022 सरसकट जरी मिळणार असली तरी ई पिक पाहणी करणे गरजेचे
ई पिक पाहणी केल्यामुळे भविष्यामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याच प्रमाणे आपल्या शेतातील पिकांची माहिती देखील सात पिक पेरा वर येणार आहे त्यामुळे ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे.
तुम्हाला जर माहित नसेल कि ई पिक पाहणी कशी करावी तर त्या संदर्भातील खालील व्हिडीओ व इतर माहिती पहा.
अधिक माहितीसाठी येथे टच करा.
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळणे गरजेचे होते. मात्र यासाठी ई पिक पाहणी करणे गरजेचे होते.
ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी केली नसेल अशा शेतकरी बांधवाना पिक नुकसानभरपाई मिळणार नाही अशी सूचना देण्यात आली होती.
परंतु आता नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी ई पिक पाहणीची अट शिथिल केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना नक्कीच दिलासा मिळाला असेल.
संपूर्ण माहिती पहा बातमी पहा