रब्बी पिक विमा 2022 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा अर्ज सादर करून द्या.
तुम्हाला माहित नसेल कि रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ खासकरून तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही जाणून घेवू शकता कि रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा करावा.
रब्बी हंगाम २०२२ साठी पिक विमा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील रब्बी पिकांचा ऑनलाईन पिक विमा अर्ज सादर करून द्यावा असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
पुढील माहिती पण कामाची आहे पिक विमा लवकरच मिळणार मंत्र्यांनी दिली माहिती.
रब्बी पिक विमा 2022 ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वतः देखील सादर करू शकतात.
पिक विमा भरायचा म्हणजे सीएससी सेंटरवर जावे लागेल असी कल्पना काही शेतकरी बांधवाना येते. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती असी आहे कि एखाद्या शेतकऱ्याला जर वाटले कि पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वतः सादर करावा तर ते नक्कीच करू शकतात.
या ठिकाणी आपण सीएससी आयडी वापरून ऑनलाईन रब्बी पिक विमा अर्ज कसा सादर करतात हे जाणून घेणार आहोत. तसेच हे देखील जाणून घेणार आहोत कि शेतकरी बांधव स्वतः रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा सादर करू शकतात.
अगोदर जाणून घेवूयात कि रब्बी पिक विमा अर्ज स्वतः सादर कसा करावा आणि त्यानंतर जाणून घेवूयात कि तुमच्याकडे जर CSC ID असेल तर तो सीएससी आयडी आणि पासवर्ड वापरून रब्बी पिक विमा ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा.
रब्बी पिक विमा 2022 सीएससी आयडी आणि स्वतः पिक विमा अर्ज सादर करण्यातील फरक
रब्बी पिक विमा rabbi pik vima 2022 साठी स्वतः अर्ज करायचा असेल तर त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
पुढील माहिती जाणून घेण्यापूर्वी माहिती करून घ्या कि सीएससी आणि स्वतः अर्ज सादर करतांना कोणता फरक जाणवणार आहे.
सीएससी आयडी वापरून अर्ज भरताना तुम्हाला csc wallet द्वारे पेमेंट करावे लागते आणि स्वतः अर्ज सादर करतांना पेमेंट करण्यासाठी Internet banking, UPI, credit card इत्यादी पद्धतीचा वापर करावा लागतो.
रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करतांना दोन्ही ठिकाणी माहिती अगदी सारखीच भरावी लागते. म्हणेच ज्या पद्धतीने सीएससी सेंटरवर अर्ज सादर केला जातो अगदी काहीशा तशाच पद्धतीने स्वतः अर्ज सादर करता येतो.
कागदपत्रे कोणती लागणार
पिक विमा ऑनलाईन अर्ज सीएससी सेंटरवर करा किंवा स्वतः करा त्यासाठी काही कागदपत्रे लागतात. ती खालीलप्रमाणे.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- सातबारा.
- एकूण जमिनीचा दाखला (८ अ).
- पिक पेरा स्वयं घोषणापत्र.
वरील कागदपत्रे रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करतांना आवश्यक असणार आहेत. वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला मिळून जातील.
पिक पेरा pdf मध्ये हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा आणि pik pera pdf 2022 डाउनलोड करून घ्या.
पुढील लेख पण वाचा असा करा पिक पेरा डाउनलोड
स्वतः अर्ज सादर करण्याची पद्धत
- गुगलच्या सर्च मध्ये pmfby हा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
- तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर प्रधान मंत्री फासल बिमा योजना हि वेबसाईट ओपन होईल.
- या वेबसाईटवर शेतकऱ्यांना किंवा ज्यांना पिक विमा अर्ज सादर करायचा आहे त्यांना farmers corner हा पर्याय शोधायचा आहे.
- मोबाईल नंबर टाकून opt मिळवा. आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
- आधार नंबर टाईप करा आणि त्यावर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका.
- दोन्ही otp टाकल्यानंतर शेतकरी लॉगीन झालेला असेल. आता संपूर्ण माहिती व्यवस्थित टाका आणि अर्ज सादर करून द्या.
कितीही व्यवस्थित समजावून सांगितले तरी स्वतः रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज २०२२ सादर करण्यास शेतकरी बांधवाना अडचण येवू शकते. त्यामुळे अशा शेतकरी बांधवांसाठी आम्ही खास व्हिडीओ तयार केलेला आहे. हा व्हिडीओ बघा आणि त्याप्रमाणे कृती करा.
रब्बी पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
सीएससी आयडी वापरून पिक विमा अर्ज करण्याची पद्धत.
सीएससी आयडी वापरून पिक विमा ऑनलाई अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भात जवळपास सर्च VLE यांना माहित आहे.
तरी देखील तुम्ही नवीन सीएससी सेंटर ओपन केले असेल आणि तुम्हाला माहित नसेल कि रब्बी किंवा खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो तर वरील व्हिडीओ बघून घ्या.
केवळ पिक विमा ऑनलाई अर्जच नव्हे तर खालील इतर माहिती देखील या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.
- csc wallet मध्ये पैसे जमा कसे करावेत.
- सीएससी आयडी वापरून रब्बी पिक विमा कसा सादर करावा.
- पिक विमा ऑनलाईन अर्जाचे पैसे csc wallet मधून कपात कसे केले जातात.
- विमा पावती प्रिंट कशी काढली जाते.
- पिक विमा पावती pdf मध्ये डाउनलोड कशी केली जाते.
हि आणि इतर अतिशय महत्वाची माहिती वरील व्हिडीओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडीओ नक्की बघा आणि तुमचा रब्बी पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.
होय रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वतः सादर करू शकतात किंवा सीएससी सेंटरवर जावून देखील सादर करू शकतात. हा ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत लगेच ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. ३१ डिसेंबर २०२२ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, एकूण जमिनीचा दाखला (८ अ),पिक पेरा स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन पिक विमा अर्ज सादर करताना लागणार आहेत.