सोयाबीन विकण्यासाठी अजून वाट पहावी कि आत्ताच विकावी

सोयाबीन विकण्यासाठी अजून वाट पहावी कि आत्ताच विकावी

जाणून घेवूयात सोयाबीन विकण्यासाठी अजून वाट पहावी कि आत्ताच विकावी या संदर्भातील सविस्तर माहिती.

सध्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढण्यास सुरुवात झालेली आहे. सोयाबीनची आवक वाढण्याचे कारण म्हणजे अनेक शेतकरी बांधवाना खर्चासाठी पैसे नसणे किंवा देणे दरांची देणी चुकती करणे हे देखील असू शकते.

सोयाबीनचे भाव वाढेल या आशेवरती बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे आणि चांगली बाब म्हणजे सध्या सोयाबीन मालाचा भाव वाढत चालेला आहे.

खरीप हंगाम २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील सोयबीनचे नुकसान झाले होते. काही शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये ढीग करून ठेवलेले सोयाबीनच्या गंजी पावसामुळे ओल्या झाल्या होत्या तर काही शेतकरी बांधवांचे काढलेले पोते शेतामध्येच पावसामध्ये भिजलेले होते.

Soyabean rate today market का वाढणार आहे सोयाबीनचे भाव पहा

पावसात भिजलेल्या सोयाबीन पिकास मिळाला कमी दर

काही शेतकरी बांधवानी पावसात सोयाबिन भिजेल या धास्तीने अगदी ओलसर सोयाबीन पिकाची मळणी केली. त्यामुळे झाले असे कि मळणी केलेल्या सोयाबीन पिकामध्ये ओलसर पण राहिला परिणामी पिकास भाव कमी मिळाला.

पावसात भिजल्यामुळे सोयाबीनची प्रत खराब झाली होती आणि यामुळे सुरुवातीला या हंगामामध्ये सोयाबीनला कमी भाव मिळाला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये शेतकरी बांधवाच्या सोयाबीनला खूप चांगला भाव मिळालेला होता.

त्यामुळे २०२२च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवानी केली होती. या वर्षी देखील सोयाबीन पिकास चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकरी बांधवानी सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे.

सोयाबीनचा सध्याचा बाजार भाव लक्षात घेता सोयाबीन विकण्यासाठी अजून वाट पहावी कि आत्ताच विकावी या संदर्भात या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

सोयाबीन विकण्यासाठी अजून वाट किती वाट पहावी.

खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पिकास शासनाने ४३०० हमी भाव जाहीर केलेला आहे. सध्या सोयाबीन पिकाला सरासरी ५५०० पेक्षा जास्त भाव मिळत आहे. हा बाजारभाव लक्षात घेता हमी भाव दारामध्ये सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमीच असेल हे नक्की.

सोयाबीन विकावी कि अजून थोडी वाट बघावी या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

सोयाबीन विक्री करण्यासाठी खालील काही बाबींचा शेतकरी बांधव विचार करू शकतात.

  • सध्या सोयाबीन पिकाची मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे आणि अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणत्याही वस्तुची आवक वाढली कि किंमत कमी होते.
  • शेतकऱ्यांना सध्या पैशांची आवश्यकता नसेल तर नक्कीच अजून थोडी वाट पहावी. १५ किंवा ३० दिवसानंतर नक्कीच सध्या सुरु असलेल्या भावापेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • सुरुवातीला सोयाबीन पिकामध्ये ओलसरपण असल्याने बाजारभाव कमी मिळाला होता. सध्या उपलब्ध असलेली सोयाबीनमध्ये ओलसरपण कमी असल्याने भाव जास्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • सोयाबीनला चांगला भाव अपेक्षित असेल तर सोयाबीनची साठवणूक देखील चांगल्या ठिकाणी करावी नसता उंदीर किंवा घूस सोयाबीनची नासाडी करण्याची शक्यता जास्त असते.
  • सोयाबीन प्रमाणेच मका व कापूस पिकांचा भाव चढण्याचा आलेख देखील वाढू शकतो.

वरीलप्रमाणे सोयाबीन भाव वाढण्याच्या शक्यता आहेत. परंतु शेतकरी बांधवानी एक बाब लक्षात ठेवावी कि ज्या प्रमाणे सोयाबीनचे भाव वाढू शकतात अगदी त्याच पद्धतीने ते कमी देखील होऊ शकतात.

यामध्ये धोका संभवू शकतो. त्यामुळे सोयाबीन विक्री करण्यासाठी सारासार विचार करावा.

कधी कधी भाव जास्त मिळेल या आशेने ठेवलेल्या सोयाबीनला कमी देखील भाव मिळाला असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *