मोबाईलद्वारे ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी कशी करावी A to Z माहिती new online voter registration form 6

मोबाईलद्वारे ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी कशी करावी A to Z माहिती new online voter registration form 6

New online voter registration process

आगामी वर्ष हे निवडणूक वर्ष आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून नवीन मतदार नोंदणी सुरु करण्यात आली आहे. ज्या तरुणांनी वयाची 18 पूर्ण केलेली आहेत किंवा जे 18 वर्षे वय पूर्ण करण्याच्या जवळ आहेत अशा तरुणांनी त्यांची नवीन मतदार नोंदणी new online voter registration करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार नोंदणीमध्ये नवीन नाव नोंदवायचे असेल तर पूर्वी एक फॉर्म भरून BLO कडे द्यावा लागत होता त्यानंतरच नवीन मतदार नोंदणी केली जात होती अर्थात हि पद्धत अजूनही सुरु आहे.

आता मात्र तुम्हाला बाहेर जायला जमत नसेल तर अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही नवीन मतदार नोंदणी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील किंवा पूर्ण करण्याच्या तयारीत असेल तर तुमची नवीन मतदार नोंदणी करून द्या. तुमचे नाव अगोदरच नवीन मतदार नोंदणी मध्ये असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घरातील पात्र उमेदवारांचे नवीन मतदार नोंदणी new online voter registration करू शकता.

नवीन मतदार नोंदणी करुणे खूपच सोपे असून अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्हीं आता हि नोंदणी करू शकता. नवीन मतदार नोंदणी कशी करावी या संदर्भातील खालील व्हिडीओ बघा आणि तुमच्या मोबाईल वरून त्या प्रमाणे नवीन नाव नोंदणी करून द्या. एकदम सोपी प्रक्रिया आहे अगदी काही मिनिटांत तुम्ही तुमची नवीन मतदार नोंदणी करू शकता.

मतदान कार्डाचे महत्व काय आहेत.

 • तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर तुम्ही सगळ्यात आधी तुमचा लोकप्रतिनिधी निवडू शकता म्हणजेच मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार तुम्हाला प्राप्त होतो.
 • मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणून देखील कार्य करते. बऱ्याच शासकीय कामासाठी ओळखपत्राचा पुरावा ग्राह्य धरला जातो.
 • विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी देखील मतदान कार्डचा उपयोग महत्वाचे कागदपत्र म्हणून केला जातो.
 • रहिवासी पुरावा म्हणून देखील मतदान कार्डचा उपयोग केला जातो.

लोकप्रतिनिधी द्वारे आपला देश चालविला जातो. अशावेळी आपण निवडत असलेला लोकप्रतिनिधी निवडणून देण्याचा योग्यतेचा आहे का जर नसेल तर तुम्ही त्याला नाकारू शकतात. अर्थात हे सर्व तेंव्हाच शक्य होते जेंव्हा तुमच्याकडे मतदान कार्ड असेल म्हणजेच तुमची मतदार नोंदणी झालेली असेल.

आता थोडाही वेळ न दवडता मूळ मुद्द्याला हात घालुयात ती म्हणजे नवीन मतदार नोंदणी कशी करावी.

बांधकाम कामगार नोदणी 1 रुपयात होणार घरकुल मिळणार

नवीन मतदार नोंदणी अर्थात फॉर्म नंबर ६ new online voter registration form 6

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फॉम ६ voter registration form 6 सदर करावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा सादर करावा लागतो या संदर्भातील खालील महत्वाची पद्धत लक्षात घ्या.

 1. तुमच्या मोबाईल मधील कोणतेही ब्राउजर ओपन करा शक्यतो बरेच फोन android या प्रणालीवर असल्याने यामध्ये क्रोम ब्राउजर अपोआप इंस्टॉल केलेले असते. ते ओपन करा.
 2. ब्राउजरमध्ये एक सर्च बार तुम्हाला दिसेल त्यामध्ये voters.eci.gov.in हा वेब ॲड्रेस टाका आणि सर्च करा.
 3. sign up या लिंकवर क्लिक करा.
 4. मोबाईल नंबर, इमेल व कॅपचा कोड टाकून continue या पर्यायावर क्लिक करा.
 5. नाव आणि अडनाव टाकून पासवर्ड निर्माण करा आणि request otp या बटनावर क्लिक करा.
 6. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करा.

आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

मतदार नोंदणी फॉर्म ६ भरण्यास सुरुवात करा voter registration form 6.

 1. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून otp मिळवा त्यासाठी Request OTP या बटनावर क्लिक करा.
 2. मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका व Verify and login या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगीन व्हाल. या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी New registration for general electors असा एक पर्याय दिसेल त्या खाली fill form 6 अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. अर्ज भरण्यासाठी तुम्ही भाषा देखील बदलू शकता. मराठी हा पर्याय निवडून भाषा बदल किंवा तुम्हाला जी भाषा सोयीस्कर वाटेल ती निवडा.

 • राज्यामध्ये महाराष्ट्र हा पर्याय निवडा.
 • जिल्हा निवडा.
 • विधानसभा मतदार संघाचा क्रमांक आणि नाव निवडा. किंवा तुम्ही लोकसभा मतदार संघाचे नाव आणि क्रमांक निवडू शकता परंतु हा पर्याय केवळ विधानमंडळ नसलेल्या केंद्रशाशित प्रदेशासाठी लागू आहे. या ठिकाणी आपण मात्र पहिला पर्याय निवडणार आहोत
 • पुढील या पर्यायावर क्लिक करा.

वैयक्तिक माहिती भरा.

वैयक्तिक माहिती या रकान्यामध्ये तुम्हाला आता तुमची माहिती सादर करायची असून तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील या ठिकाणी अपलोड करायचा आहे.

अर्जदाराने त्याचे पहिले नाव व आडनाव इंग्रजीमध्ये टाईप टाईप करायचे आहे. इंग्रजीमध्ये टाईप केलेल्या नावाचे रुपांतर आपोआप मराठी भाषेमध्ये होईल. मराठी भाषेमध्ये रुपांतर होत असतांना त्यामध्ये काही चूक झाली आहे असे तुम्हाला वाटल्यास त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या मराठी फाँटचा उपयोग करून तुम्ही झालेली चूक दुरुस्त करू शकता.

फोटो अपलोड करतांना लक्षात असू द्या कि फोटोची साईज उभी 4.5 व रुंदी 3.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. JPG JPEG या प्रकारातील 2 MB पर्यंत साईज असलेला फोटो अर्जदार अपलोड करू शकतो.

अर्जदाराची माहिती आणि फोटो अपलोड केल्यानंतर पुढील या बटनावर क्लिक करा.

Annasaheb patil tractor yojana 2023अण्णासाहेब पाटील योजनेची बंद असलेली ट्रॅक्टर खरेदी योजना उद्यापासून पुन्हा होणार सुरु

नातेवाईक संदर्भातील माहिती भरा.

नवीन मतदार नोंदणी करतांना अर्जदाराने त्यांच्या नातेवाईक जसे कि आई वडील पती पत्नी किंवा अर्जदार जर अनाथ असेल तर कायदेशीर जे पालक आहेत त्या संदर्भातील माहिती भरायची आहे. जसे कि त्यांचे नाव, आडनाव व अर्जदाराचे त्यांच्या विषयी असलेले नाते इत्यादी.

अर्जदाराने त्यांचा चालू स्थितीतील किंवा इतर नातेवाईक यांच्या मोबाईल नंबर टाकावा. त्यावर एक otp येईल तो व्हेरीफाय करा. इमेल आयडी टाका किंवा तुमच्याकडे इमेल नसेल तर तुमच्या नातेवाईकांचा इमेल आयडी सुद्धा तुम्ही टाकू शकता.

अर्जदाराचा आधार कार्ड नंबर टाका.

जन्मतारीख निवडा.

वयाचा पुरावा म्हणून जन्मप्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालक परवाना इत्यादीपैकी कोतेही एक दस्ताऐवज अपलोड करा.

अर्जदाराचा घर क्रमांक गल्ली परिसर इत्यादीसहित पत्ता व्यवस्थित टाईप करावा. पत्ता टाईप करतांना इंग्रजी भाषेमध्ये करावा तो आपोआप मराठीमध्ये खालील चौकटीमध्ये टाईप होईल.

मराठीमध्ये टाईप होत असतांना काही चूक होत असेल तर ती तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या युनिकोड या मराठी फाँटचा उपयोग करावा.

घरातील एका सदस्याचे तपशील सादर करा.

अर्जदाराच्या पालकाचे आधार कार्ड अपलोड करा.

अर्जदार अपंग असेल तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये सादर करायची आहे.

अर्जदाराच्या घरातील ज्या व्यक्तींचे मतदान यादीमध्ये नाव आहे त्या व्यक्तीचे नाव आडनाव टाकून त्यांचे त्यांच्या मतदानाचा क्रमांक दिलेल्या चौकटीमध्ये टाका.

घोषणा वाचून घ्या यामध्ये शहराचे किंवा गावाचे नाव टाका राज्य टाकून पुढील या पर्यायावर क्लिक करा.

सर्वात शेवटी कॅपचा कोड टाकून तुम्ही अर्ज कसा सादर केला आहे याच्या प्रीव्ह्यू बघण्यासाठी पूर्वावलोकन या बटनावर क्लिक करा.

तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला तुम्ही आता भरलेला अर्ज कसा भरला गेला आहे या संदर्भात माहिती दिसेल. अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर सादर केली असल्याची खात्री झाल्यावर अर्ज सादर करण्यासाठी सादर या बटनावर क्लिक करा किंवा अर्जामध्ये काही बदल असेल तर keep editing या पर्यायावर क्लिक करून भरलेल्या अर्जामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता.

सादर या बटनावर क्लिक करा.

are you sure you want to submit this form अशी एक सूचना येईल. Yes या बटनावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुमचा नवीन मतदार नोंदणी अर्ज new online voter registration form 6 सादर झाला असून त्या अर्जासंदर्भात संदर्भ नंबर देखील या ठिकाणी अशाप्रकारे तुम्हाला मिळणार आहे.

download acknowledgement या बटनावर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता.

मतदार अर्ज नोंदणी स्थिती online voter registration check

अर्ज सादर केल्यावर सदरील अर्ज हा तुमच्या गावातील ग्रामसेवक यांच्या आयडीला जातो. त्या ठिकाणी ग्रामसेवक त्या अर्जासंदर्भात छाननी करतात व सर्वकाही बरोबर असेल तर तो अर्ज पुढे पाठवितात.

नवीन मतदार नोंदणी अर्ज new online voter registration अर्ज सादर केल्यावर त्या अर्जाची स्थिती काय आहे तपासून घेण्यासाठी परत एकदा voters.eci.gov.in या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर जा.

या ठिकाणी मेन पेजला आल्यावर पेजला थोडे खाली स्क्रोल करा.

Track application status हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.

reference number टाका राज्य निवडा आणि सबमिट करा.

जसे हि तुम्ही सबमिट कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नवीन मतदार नोंदणी new online voter registration form 6 संदर्भातील सद्यस्थिती कळेल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमची नवीन मतदार नोंदणी करू शकतात.

नवीन मतदार नोंदणी कशी करावी?

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर फॉर्म ६ भरून नवीन नोंदणी करता येते. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने मतदार नोंदणी करता येते. हि नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोग या वेबसाईटला भेट द्यावी लागते.

नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत?

Election commission of Inda वेबसाईटवर नवीन नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येते. ऑनलाईन अर्ज सादर करतांना अर्जदाराचा फोटो, ओळख पत्र व घरातील ज्या सदस्याचे मतदान यादीमध्ये नाव आहे त्याच्या मतदान कार्डचा नंबर आवश्यक असतो.

मतदान कार्ड कसे काढावे?

भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट देवून ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड डाउनलोड करता येते. हे मतदान कार्ड डाउनलोड कसे करावे किंवा नवीन नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *