water detector machine पाणी तपासणी यंत्राने तपासले जाते विहीर किंवा बोअरचे पाणी पहा लाईव्ह

water detector machine पाणी तपासणी यंत्राने तपासले जाते विहीर किंवा बोअरचे पाणी पहा लाईव्ह

काय आहे water detector machine अर्थात पाणी तपासणी यंत्र कसे करते कार्य पहा डायरेक्ट स्पॉटवरून लाईव्ह माहिती

या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे त्यामध्ये हे पाणी तपासणी यंत्र water detector machine कसे कार्य करते त्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे खालील व्हिडीओ नक्की पहा.

शेतीसाठी पाणी असेल तर अगदी खडकाळ जमिनीवर देखील चांगले पिक घेता येऊ शकते. शेती जर फायद्यात आणायची असेल तर शेतीला पाणी असणे गरजेचे आहे.

शेतीला पाणी मिळावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल घेतलेले आहेत परंतु त्यांनी घेतलेल्या बोअरवेलला किंवा विहिरीला मुबलक पाणी लागले नाही.

शेतामध्ये बोअर घ्यायचा असेल किंवा नवीन विहीर खोदकाम करायची असेल तर अशावेळी पाणवड्या कडून पाणी बघितले जाते.

पाणवडी पारंपारिक पद्धतीने पाणी बघतात यासाठी ते नारळ असेल किंवा अंडे असेल किंवा इतर कोणत्याही पारंपारिक पद्धतीचा पाणी शोधण्यासाठी उपयोग करतात.

विहीर अनुदान योजना 2023 असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून vihir anudan yojana

पाणवड्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदकाम करतात किंवा बोअरवेल घेतात. यासाठी शेतकरी बांधवाना खूप खर्च येतो.

पाणवड्याने दिलेय स्थळावर बऱ्याच वेळा घेतलेला बोअरवेल किंवा विहीर कोरडीठाक जाते. त्या विहिरीला किंवा बोअरवेलला पाणी न लागल्याने शेतकरी बांधवांचा विहीर खोदकाम खर्च वाया जातो.

water detector machine द्वारे तपासा विहीर किंवा बोअरचा स्पॉट

विहीर खोदकाम किंवा नवीन बोअरवेल करतांना शेतकरी बांधवानी जर तंत्रज्ञानावर आधारित मशीनचा वापर केला तर नक्कीच त्यांच्या विहिरीला किंवा बोअरला पाणी लागू शकते.

अर्थात कोणत्याही मशीनला भूगर्भातील पाणी पातळी अचूक टिपता येत नसली तरी मशीनद्वारे तपासलेल्या स्पॉटला पाणी लागण्याची दाट शक्यता असते.

पाणी तपासणी मशीन water detector machine कसे कार्य करते, कोणत्या आधारावर पाणी तपासले जाते, पाण्याचा स्पॉट कसा निवडला जातो हि आणि इतर महत्वाची माहिती आम्ही मिळविली आहे जेणे करून आपल्या शेतकरी बांधवाना याचा लाभ होईल.

कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र येथे कार्यरत असलेले डॉ. ईश्वर वाघ यांनी हे पाणी तपासणी मशीन borewell water detector machine आणले असून ते कसे कार्य करते या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बांधवाना सांगितलेली आहे.

खालील व्हिडीओ पहा आणि तुम्हाला देखील तुमच्या शेतामध्ये बोअरवेल घ्यायचा असेल तर त्या संदर्भात तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.

संपूर्ण माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

विहिरींची पाणी पातळी वाढविणे शक्य

भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालेलेली आहे. पाणी उपसा मोठ्या प्रमाणत होत असल्याने या पाणी पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. शेतातील विहिरींची किवा बोअरची पाणी पातळी वाढवायची असल्यास विहिरींचे पुनर्भरन करणे गरजेचे आहे.

विहीर किंवा बोअर शेजारी रिचार्ज ट्रेंच केल्यास विहिरीची पाणी पातळी वाढू शकते. रोजगार हमी योजनेतून देखील विहीर पुनर्भरन करता येवू शकते. अधिक माहितीसाठी तुमचं गावातील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.

ज्या पिकांना जास्त पाण्याची गरज असेल ती पिके शक्यतो टाळावीत. असे केल्याने पाण्याची बचत होईल व कमी पाण्यावर येणारे पिक घेतल्याने शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *