जाणून घेवूयात ट्रॅक्टर खरेदी योजना संदर्भातील सविस्तर माहिती Annasaheb patil tractor yojana 2023.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मध्यंतरी बंद केलेली ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार असल्याने शेतकरी बांधवाना याचा फायदा होणार आहे.
अनेक बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे.
मंडळाच्या योजनेचा जवळपास ७० हजार लाभार्थींना विविध बँकांनी ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज दिले असून ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे.
अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज
Annasaheb patil tractor yojana 2023
शेतातील सर्व कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहेत. त्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरला खूप महत्व आहे. आर्थिक पाठबळ नसल्याने अनेक शेतकरी बांधवाना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही.
अशावेळी तुम्ही जर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या ट्रॅक्टर खरेदी योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
या ट्रॅक्टर खरेदी सवलतीला योजनेमध्ये महिंद्रा आणि एस्कॉट टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून १० हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
योजनेचा लाभ घ्या.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या वतीने इतरही योजना राबविल्या जातात त्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा या संदर्भातील सविस्तर माहितिचा व्हिडीओ देखील डिजिटल डीजी या युट्युब चाणालवर पब्लिश केलेला आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन असा करा online अर्ज
तुम्ही जर मराठा असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.