अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत बँक ऑफ इंडिया कर्ज देणार असून या संदर्भात बँकेशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक अडचण येते. केवळ भांडवल न मिळाल्याने अनेक तरुणांना आपला व्यवसाय सुरु करता येत नसल्याचे अनेक उदाहरणे बघण्यास मिळते. अशावेळी शासकीय अनुदान मिळते का यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात.

WhatsApp Group
WhatsApp Group

शासकीय कर्ज योजना तर अनेक असतात परंतु कर्ज मात्र कोणी देत नाही अशी अवस्था सध्या मराठा तरुणांची झालेली आहे. परंतु आता कर्ज मिळविणे पहिल्यापेक्षा थोडे अधिक सोपे होण्यची चिन्हे दिसताहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळांचे नवीन अध्यक्ष श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कसोसीने प्रयत्न सुरु केले आहेत.

या योजना अंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार असून ते खलील प्रमाणे आहे
🔸 १० हजार
🔸 ५० हजार
🔸 १ लाख
👀 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून माहिती सविस्तर माहिती वाचून घ्या.

पुढील माहितीपण वाचा annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार

अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत बँकेशी सामंजस्य करार

मराठा तरुणांना कर्ज मिळण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी बँक ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे. या बँकेद्वारे मराठा तरुणांना कर्ज दिले जाणार आहे.

सुरुवातीला बँक ऑफ इंडियाच्यावतीने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे तरुण लाभार्थी कर्जाची मागणी करु शकतात. पहिला टप्पा यशस्वी झाला कि दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पुढील लेख पण वाचा उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

त्यामुळे आता मराठा तरुणांना किंवा असे तरुण ज्यांसाठी कोणतेही मंडळ कार्यरत नाही अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे बेरोजगार तरुणांचे व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये १ लाख मराठा उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ प्रयत्नशील आहे.

अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत ३४ तालुक्यात दिले जाणार कर्ज

याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडिया सोबत हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्जावरचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले जाते. 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाकडून मिळणाऱ्या कर्जाला क्रेडिट गॅरेंटी दिली जाणार आहे. क्रेडिट गॅरेंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाणार आहे. 

महामंडळाच्या योजनांबाबत बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील एकूण 34 तालुक्यात लागू करण्यात आलेला आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ऑनलाईन अर्ज असा करा.

व्यवसायासाठी कर्ज मिळणे होणार सोपे.

या सामंजस्य कराराबाबतचे अधिकृत परिपत्रक बँक ऑफ इंडियाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या संकेतस्थळावर देखील हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मराठा तरुणांना व्यवसाय उभारणी करिता लागणाऱ्या कर्जासंबंधी येणाऱ्या अडचणींवर मात करुन बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि योजना पोहोचविण्यासाठी हा पहिला टप्पा आहे. हा टप्पा जर यशस्वी झाला तर पूर्ण बँक ऑफ इंडिया हे कार्य महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांकरिता करणार आहे.

तुम्ही जर मराठा तरुण असाल आणि स्वतः उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अण्णासाहेब पाटील लोन योजना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *