Ayushman card ekyc ईवायसी करा तरच मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत लाभ अशी करा ekyc केवळ 4 मिनिटांत

Ayushman card ekyc ईवायसी करा तरच मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत लाभ अशी करा ekyc केवळ 4 मिनिटांत

Ayushman card ekyc तुम्हाला माहितच असेल कि आयुष्यमान कार्ड ayushman card जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शासनाकडून ५ लाख रुपयांपर्यत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

आयुष्यमान कार्ड संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करावे हे जाणून घेवू शकता.

आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी ekyc करणे खूपच महत्वाचे आहे. आयुष्यमान कार्डसाठी ekyc करणे खूपच सोपे असून अगदी मोबाईलवर देखील तुम्ही ayushman card साठी ekyc करू शकता.

आयुष्मान भारत योजना यादी pdf अशी करा डाउनलोड पहा तुमचे नाव

अशी करा मोबाईलवरून Ayushman card ekyc अगदी काही मिनिटात

तुमच्याकडे जर स्मार्ट फोन असेल तर अगदी काही मिनिटात आयुष्यमान कार्ड ayushman card साठी ekyc कशी करावी लागते त्याचप्रमाणे हे कार्ड डाउनलोड कसे करावे लागते या संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

 1. गुगल प्लेस्टोअरच्या सर्चबारमध्ये ayushman app असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
 2. ayushman app सुरु झाल्यावर तुम्ही यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा निवडू शकता.
 3. login या बटनावर टच करा.
 4. beneficiary व operator असे दोन पर्याय दिसतील यापैकी एका पर्यायावर टच करा. तुम्ही जर स्वतः स्वताच्या आयुष्यमान कार्डची ekyc करू इच्छित असाल तर beneficiary या पर्यायावर टच करा.
 5. मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय या बटनावर टच करा.
 6. दिलेल्या चौकटीत तुमच्या मोबाईलवर आलेला otp टाका.
 7. त्या खालील चौकटीमध्ये कॅपचा कोड टाकून लोगीन या बटनावर टच करा.
 8. वरील माहिती भरल्यानंतर लाभार्थ्याची माहिती टाका जसे कि राज्य या रकान्यामध्ये महाराष्ट्र निवडा. स्कीम या रकान्यामध्ये PMJAY-MJPJAY हा पर्याय निवडा.
 9. लाभार्थी सर्च करण्याच्या या टिकाणी अनेक पद्धती दिलेल्या आहेत जसे कि family id, Adhar number, Name, PMJAY या पैकी एक पद्धत निवडा.
 10. तुमचा जिल्हा निवडा.
 11. आधार नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सर्च करा.

फोटो अपलोड आणि इतर माहिती भरा

आता पेजला खाली स्क्रोल करा. या ठिकाणी लाभार्थींच्या घरातील सदस्यांचे तपशील दिसतील. आयुष्यमान कार्ड ayushman card ekyc करण्यासाठी यापैकी एक सदस्य निवडा. do ekyc या बटनावर टच करा.

एक गाव एक वाण ek gav ek van योजना सुरु हे. ७ हजार अनुदान.

 1. आधार otp, फिंगर प्रिंट, इरीस स्कॅन, फेस ऑथेंटिकेशन असे चार पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील यापैकी एक पर्याय वापरून तुम्हाला लॉगीन करायचे आहे.
 2. आधार हा पर्याय निवडा.
 3. कंसेट मान्य करा आणि allow या बटनावर टच करा.
 4. तुमच्या आधार नंबर समोर व्हेरीफाय या पर्यायावर टच करा.
 5. जसेहि तुम्ही व्हेरीफाय या बटनावर टच कराल त्यावेळी तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 6. आता आधार संदर्भातील तपशील तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड  करायचा आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि फोटो कडून अपलोड करा.
 7. मोबाईल नंबर टाका आणि व्हेरीफाय करा.
 8. मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 9. रिलेशनमध्ये कुटुंबप्रमुखांसोबत तुमचे नाते काय आहे ते दिलेल्या पर्यायामधून निवडा.
 10. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पिन कोड टाका.
 11. तुमचा जिल्हा निवडा.
 12. रुरल किंवा अर्बन जो पर्याय असेल तो निवडा.
 13. तुमचा तालुका निवडा.
 14. ज्या गावात राहत असाल ते गाव दिलेल्या पर्यायामधून निवडा आणि सबमिट करा. या ठिकाणी स्टेट्स पेंडिंग दाखवत आहे. काही वेळानंतर या लाभार्थीचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येणार आहे.

अशाच पद्धतीचा उपयोग करून एक एक करत तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्यमान कार्ड ayushman card ekyc करून घ्या. ekyc केल्यानंतर हे कार्ड डाउनलोड करता येते. कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

असे करा आयुष्यमान कार्ड डाउनलोड

ज्या सदस्यांचे कार्ड डाउनलोड करायचे आहे त्या सदस्याच्या नावासमोर दिसत असलेल्या डाउनलोड कार्ड या बटनावर टच करा.

लाभार्थीचे नाव दिसेल त्यावर टच करा. या ठिकाणी तीन पर्याय तुम्हाला दिसेल डाउनलोड, १) डाउनलोड २) प्रिंट ३) शेअर.

तुम्हाला जर हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून नंतर प्रिंट काढू शकता.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *