Namo shetkari yojana नमो शेतकरी योजना तारीख जाहीर या दिवशी जमा होणार बँकेत पहिला हफ्ता

Namo shetkari yojana नमो शेतकरी योजना तारीख जाहीर या दिवशी जमा होणार बँकेत पहिला हफ्ता

नमो शेतकरी योजना Namo shetkari yojana 2023

शेतकरी बांधवाना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वार्षिक ६ हजार रुपये मिळतात हे तर सर्वाना माहितच आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना आणली आणि यामध्ये देखील वार्षिक ६ हजार रुपये शेतकरी बांधवाना मिळणार आहे.

पीएम किसान व नमो शेतकरी योजना असे दोन्ही मिळून शेतकरी बांधवाना १२ हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. म्हणजेच आता शेतकरी बांधवाना दर महा १००० रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार आहे. पीएम किसान योजनेचे पैसे अनेक शेतकरी बांधवाना मिळत आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली असली तरी या योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार या संदर्भात शेतकरी बांधवाना उत्सुकता लागलेली होती. महासन्मान योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार आहे या संदर्भातील तारीख आता फिक्स झाली आहे.

नमो शेतकरी योजना 2023 सुरु आता दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 1000 प्रती महिना लाभ मिळणार

Namo shetkari yojana या दिवशी मिळणार पैसे

दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. शिर्डी येथे एक नियोजित कार्यक्रम आयोजित केला आहे या नियोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत.

या योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत त्याप्रमाणे नमो योजनासंबंधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती.

योजनेमध्ये अधिक शेतकऱ्यांच्या समावेश

मात्र महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याच्या निधीच्या वितरणास विलंब होत होता.

विलंब होण्याचे एक कारणहि आहे कि कृषी विभागाने जी पडताळणी केली त्यामध्ये नवीन 7 लाख 41 हजार शेतकरी समाविष्ट करण्यात आलेलेल आहेत म्हणजेच केंद्र सरकारचा पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र आता नवीन अभिलेखाची तपासणी केल्यावर राज्यातील पात्र लाभार्थ्याची संख्या 93.07 लाख एवढी झालेली आहे.

म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान समान निधीपासून वंचित होते त्यामध्ये अधिकची भर पडलेल्या ७ लाख ४१ हजार शेतकरी बांधवाना देखील आता या योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे.

तर तारीख लक्षात असू द्या येणाऱ्या २६ ऑक्टोबर २०२३ पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता वितरीत केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *