aadhar document update last date 14 डिसेंबर पर्यंत आधार संदर्भातील कागदपत्रे मोफत अपलोड करा नंतर शुल्क

aadhar document update last date 14 डिसेंबर पर्यंत आधार संदर्भातील कागदपत्रे मोफत अपलोड करा नंतर शुल्क

aadhar document update last date 14

सध्या बऱ्याच जणांच्या मोबाईलवर आधार संदर्भात कागदपत्रे अपलोड करण्याचे संदेश येत आहेत. ज्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना ठीक आहे परंतु जे बाकी आहेत त्यांच्यासाठी १४ तारखेपर्यंत मोफत कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे.

त्यानंतर मात्र हे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

तुम्हाला माहितच आहे कि एखादी गोष्ट मोफत म्हटल्यावर त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाच्या ज्या वेबसाईटवर हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

त्या वेबसाईटवर देखील गर्दी होऊन वेबसाईट सुरळीत चालण्यास अडथळा येवू शकतो…त्यामुळे लगेच तुमच्या आधार संदर्भातील कागदपत्रे ऑनलाईन मोफत अपलोड करून द्या.

aadhar document update last date 14

आता तुम्ही म्हणाल हे aadhar document update आम्हाला कसे जमेल तर अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही केवळ खालील व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि त्या प्रमाणे कृती करून बघा.

अगदी काही मिनिटात तुम्ही तुमचे कागदपत्रे मोफत अपलोड करू शकता. एकदा का तुम्ही तुमचे कागदपत्रे यशस्वीपणे अपलोड केले कि मग तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे अशाच पद्धतीने आधार संदर्भातील कागदपत्रे अपलोड करा जेणे करून तुमच्या खर्चामध्ये बचत होईल.

चला तर आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात कि कागदपत्रे अपलोड कशी करावीत.

Ayushman card ekyc ईवायसी करा तरच मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत लाभ अशी करा ekyc केवळ 4 मिनिटांत

कोणकोणती कागदपत्रे अपलोड करू शकता

 1. शिधापत्रिका.
 2. मतदान ओळखपत्र.
 3. किसान फोटो पासबुक.
 4. भारतीय पासपोर्ट.
 5. सरकारने जारी केलेले ओळखपत्र प्रमाणपत्र एससी एसटी ओबीसी प्रमाणपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र ज्यामध्ये फोटो असणे गरजेचे आहे.
 6. अपंगत्व ओळखपत्र.
 7. ट्रान्सजेन्डर ओळखपत्र.

यापैकी कोणतेही एक

ओळखीसाठी अपलोड करावी लागणारी कागदपत्रे

 1. तुरुंग अधिकाऱ्याने जारी केलेले कैदी इंडक्शन दस्तऐवज.
 2. शाळा सोडल्याचा दाखला.
 3. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट प्रमाणपत्र.
 4. पॅन कार्ड पॅन.
 5. पेन्शन पेमेंट ऑर्डर किंवा मेडिक्लेम कार्ड
 6. वाहन चालविण्याचा परवाना
 7. स्वातंत्र्यसैनिक फोटो ओळखपत्र.
 8. पाणी गॅस किंवा टेलिफोन मोबाईल ब्रॉडबँड बिल तीन महिन्यापेक्षा जुने नसावे.
 9. फोटोसह अनुसूचित कमर्शियल बँक पोस्ट ऑफिस पासबुकवर शिक्का मारलेला स्वाक्षरी केलेली आणि शिक्का मारलेली शेड्युल कमर्शिअल बँक पोस्ट ऑफिस खाते.
 10. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तीन महिन्यापेक्षा जुने नसलेले
 11. वैद्य भाडे भाडेपट्टी किंवा रजा आणि परवाना करार.

वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करण्यासठी जवळ असू द्या.

ऑनलाईन पद्धत समजून घ्या घ्या. खालील पद्धतीचा अवलंब करा

 1. तुमच्या मोबाईलवर आलेल्या संदेशातील लिंकवर क्लिक करा किंवा myaadhaar.uidai.gov.in/du/mr/7dDcU या वेबसाईटला भेट द्या.
 2. हिंदी इंग्रजी मराठीसह इतर भाषेत देखील तुम्ही हि वेबसाईट बघू शकता. तुमची भाषा निवडा.
 3. जे कागदपत्रे सादर करायचे आहेत त्या संदर्भात काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या. कागदपत्रे अपलोड करण्यासठी काही मदत हवी असेल तर टोल फ्री नंबर देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
 4. सर्व सूचना वाचून घ्या त्यानंतर ‘सबमिट करण्यासाठी क्लिक करा’ या बटनावर क्लिक करा.
 5. तुमचा आधार नंबर आणि कॅपचा कोड दिलेल्या चौकटीत टाका आणि Sent OTP या बटनावर क्लिक करा.
 6. तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्यावर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाका. १ मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलवर जर otp आला नाही तर resend OTP या बटनावर क्लिक करा.
 7. तुम्हाला एक सूचना दिसेल कि आधारला कागदपत्रे जोडण्याचे शासनाचे काय उद्दिष्ट आहे. तुम्ही अपलोड केलेले कागदपत्रे नाकारली गेली तर परत तुम्ही ते अपलोड करू शकता. सूचना वाचून घ्या. तुमच्या पट्ट्यामध्ये बदल झाला असेल तर त्यासाठी एक वेगळी लिंक आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधारचा पत्ता बदलू शकता.
 8. पुढे या बटनावर क्लिक करा.
 9. कागदपत्रे अपलोड कसे करावे लागते या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती नीट समजावून घ्या आणि पुढे या बटनावर क्लिक करा.
 10. या ठिकाणी जसे हि तुम्ही पुढे या बटनावर क्लिक कराल त्यावेळी आधार संदर्भातील माहिती तुम्हाला दिसेल. consent मान्य करा आणि पुढे या बटनावर क्लिक करा.

असे करा ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करा

जे कागदपत्रे तुम्ही अपलोड करणार आहात त्यांची साईज 2 MB पेक्षा जास्त नसली पाहिजे आणि फाईलचा format हा png JPG किंवा pdf असला पाहिजे.

 • पहिले डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी दिलेल्या यादीतून पर्याय निवडा आणि ते डॉक्युमेंट अपलोड करा.
 • अशाच पद्धतीने दुसरे डॉक्युमेंट अपलोड करा.
 • दोन्ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची सहमती मिळण्यासाठी दिलेल्या चौकटीत तिक करा आणि पुढे या बटनावर क्लिक करा.
 • ठीक आहे या बटनावर क्लिक करा.
 • प्रस्तुत करणे या बटनावर क्लिक करा.

झाले अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कागदपत्रे आधारसाठी मोफत अपलोड केले आहेत. याची पावती या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करताच हि पावती तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल. पावतीवर सर्व तपशील असेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांचे देखील आधार संदर्भातील कागदपत्रे एक एक करत अपलोड करू शकता.

लक्षात असू द्या मोफत कागदपत्रे फक्त १४ डिसेंबर २०२३ पर्यंतच करू शकता. aadhar document update last date 14

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *