जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु

जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु

मित्रांनो जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज करता येतो. अर्ज अगदी मोबाइल वरून देखील करता येतो.

जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 • मिरची कांडप यंत्र
 • तुषार संच.
 • 5 HP पाण्यातील विद्यत मोटार.
 • झेरॉक्स मशीन.
 • पिठाची गिरणी.
 • अपंगाना झेरॉक्स मशीन.
 • अपंग व्यक्तीसाठी सायकल.
 • अपंग व्यक्तीसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविणे

जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून देखील करता येतो.

वरीलप्रमाणे जिल्हा परिषद योजना सुरु झालेल्या आहेत. एक एक करत आपण या योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर शक्यतो त्यावरून अर्ज केल्यास अधिक सोयीचे होते. परंतु तुमच्याकडे कॉम्प्युटर नसेल तर मात्र हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाइलवरून देखील करू शकता.

WhatsApp Group Link

जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत कोणकोणत्या योजना सुरु झालेला आहेत आणि ते अर्ज मोबाईलवरून कसे सादर करता येतात या संदर्भातील माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत बघा.

वरील ज्या योजना आहेत त्या जालना जिल्हा परिषद अंतर्गत आहेत या बाबीची सर्वांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची पद्धत

 • तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरळीत सुरु असल्याची खात्री करा.
 • गुगलच्या सर्च बारमध्ये zp yojna jalna किंवा जालना zp yojana असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
 • जालना जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
 • समाज कल्याण विभाग निवडा.
 • विभाग निवडल्यानंतर विविध योजनांची यादी दिसेल त्यामधील ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडा आणि अर्जामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करा.
 • अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.
 • जसेहि तुम्ही अर्ज सबमिट कराल त्यावेळी अर्ज pdf मध्ये ओपन होईल. या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि पंचायत समिती येते अर्ज सादर करून द्या.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

जिल्हा परिषदेच्या या विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही काही कागदपत्रे अर्जदारास या अर्जासोबत जोडायची आहेत. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

व्हिडीओ लिंक

वरील व्हिडीओ बघा जेणे करून तुम्हाला कळेल कि या योजनेसाठी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा केला जातो.

 • आधार कार्ड.
 • रहिवासी प्रमाणपत्र.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा ग्रामीण भागातील मागासवर्गीय असावा.
 • लाभार्थी हा दारिद्र रेषेखाली असून निवड ग्रामसभेत झालेली असावी.
 • जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकार्‍याचे असणे आवश्यक राहील.
 • लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
 • लाभार्थीच्या नावाचा सातबारा असणे आवश्यक
 • यापूर्वी कृषी विभाग महिला बालकल्याण किंवा इतर विभागामार्फत लाभ घेतलेले नसल्याचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
 • स्वतःच्या मालकीची 500 चौरस फूट जागा असावी त्यासाठी नमुना नंबर आठ किंवा सातबारा असावा ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे.
 • लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे.
 • लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा तसेच वय 18 वर्षे पेक्षा कमी नसावे
 • दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाइन प्रमाणपत्र 40% पेक्षा कमी नसावे.
 • यापूर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायत प्रमाणपत्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *