पंचायत समिती योजना झेरॉक्स मशीन ऑनलाईन अर्ज सुरु

पंचायत समिती योजना झेरॉक्स मशीन ऑनलाईन अर्ज सुरु

दिव्यांग व्यक्तींना पंचायत समिती योजना 2022 अंतर्गत झेरॉक्स मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल आणि योजनेचा लाभ घेवू इच्छित असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजनेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहेत. तुम्ही जर अपंग व्यक्ती असाल तर झेरॉक्स मशीन व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. disability scheme 2022 maharashtra.

ऑनलाईन अर्ज अगदी मोबाईल वरून देखील करता येवू शकतो. परंतु तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल तर नक्कीच हि अर्ज प्रक्रिया सोपी होईन जाते.

चला तर जाणून घेवूयात कि पंचायत समिती योजना 2022 अंतर्गत दिव्यांग व्यक्ती कोणकोणत्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकते handicap yojana 2022 maharashtra.

पुढील माहिती बघा जिल्हा परिषद अंतर्गत मिळणार या योजना

पंचायत समिती योजना २०२२ अंतर्गत मिळणार विविध योजनांचा लाभ.

दिव्यांग व्यक्तींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात.

या योजनांची माहिती बऱ्याच जणांना नसण्याची शक्यता असते. अशावेळी ते या योजनांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे अपंग म्हणजेच दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यावी जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध दिव्यांग व्यक्तीसाठी खालील योजना सुरु आहेत.

 • दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन.
 • अपंग म्हणजेच दिव्यांग व्यक्तीसाठी सायकल.
 • मिनी पिठाची गिरणी पुरविणे

वरील योजनांसाठी दिव्यांग व्यक्ती ऑनलाइन अर्ज करू शकतात. हा अर्ज अगदी मोबाईलचा वापर करून देखील करता येतो.

या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील दिव्यांग व्यक्ती त्यांच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • मोबाईल मधील ब्राउजर ओपन करा.
 • गुगलच्या सर्च बारमध्ये जालना झेड पी हा कीवर्ड इंग्रजीमध्ये jalna zp yojna असा सर्च करा.
 • जालना जिल्हा परिषदेची वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन होईल. या ठिकाणी समाज कल्याण हा विभाग लाभार्थींना शोधायचा आहे.
 • समाज कल्याण विभागावर क्लिक केल्यावर झेरॉक्स मशीन सहित इतर विविध योजनांचे अर्ज ओपन होईल.
 • ज्या अर्जासाठी अर्ज करायचा आहे त्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करून अर्जामध्ये योग्य ती माहिती भरा.
 • सर्वात शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या.
 • अर्जाची प्रिंट काढा आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये इतर विविध आवश्यक कागदपत्रासोबत अर्ज सादर करून द्या.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे व इतर अटी.

 • आधार कार्ड.
 • रहिवासी प्रमाणपत्र.
 • दिव्यांग लाभार्थीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे आणि तो ग्रामीण भागातील असावा.
 • लाभार्थीचे दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरण अधिकारी यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र.
 • प्रमाणपत्रावर अपंगत्वाची टक्केवारी ४० पेक्षा कमी नसावी.
 • दिव्यांग लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची ५०० स्केअर फुट जागा असावी. त्यासाठी नमुना न ८ अ किंवा सातबारा असावा.
 • लाभार्थी बेघर असावा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा. हा व्हिडीओ बघून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून देखील सादर करू शकता.

खालील व्हिडीओमध्ये जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत झेरॉक्स मशीनसाठी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे.

दिव्यांग व्यक्तीसाठी कोणकोणत्या योजना आहेत?

पंचायत समिती panhayat samiti yojana 2022 अंतर्गत झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी व सायकल या योजनेसाठी दिव्यांग व्यक्ती अर्ज करू शकतात.

दिव्यांग योजनासाठी अर्ज कसा करावा?

ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून पंचायत समिती कार्यालयात सादर करावी. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.

अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे सादर करावेत?

ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढल्यानंतर त्यासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडवी लागतात या संदर्भात संपूर्ण माहिती वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

या योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण?

मागासवर्गीय लाभार्थी या पंचायत समिती योजना 2022 अंतर्गत अर्ज करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *