राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना अंतर्गत मिळणार घरकुल

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना अंतर्गत मिळणार घरकुल

या लेखामध्ये राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे नाव राजीव गांधी घरकुल योजना करण्यात आलेले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. त्यामुळे घरकुल बांधकामाचे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

WhatsApp Group
WhatsApp Group

शासन बऱ्याच योजना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी राबवीत असते. परंतु बऱ्याच नागरिकांना या योजनांची माहिती नसल्यामुळे अनेक नागरिक अशा योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या पद्धतीने इंदिरा आवास योजनेसाठी घरकुल दिले जाते अगदी त्याच पद्धतीने या योजनेसाठी देखील निधी दिला जातो.

जिल्हा परिषद योजना देखील सुरु झालेला आहेत या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करून द्या.

जाणून घेवूयात राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना संदर्भातील अधिक माहिती.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल/बेघर/अल्पभूधारक गरजूसाठी घरे बांधण्यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा क्र.१ व २ योजना सुरु केलेली आहे.

rajiv gandhi gharkul yojana क्र.१ ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी आहे. ज्या प्रमाणे इंदिरा आवास योजना राबविली जाते अगदी तसाच पद्धतीने हि योजना देखील राबविली जाते.

या योजनेचे निकष इंदिरा आवास योजनेच्या निकषाप्रमाणेच असून सदर योजनेच्या निधीचा पुरवठा राज्य शासनाकडून केला जातो.

पुढील योजना पण पहा जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु

राजीव गांधी योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी निकष

ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबास शासनाच्या वतीने राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ या योजनेचा लाभ दिला जातो.

या योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबास रु.४५०००/- बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. दिनांक २७ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयानुसार योजना क्र.२ योजना सुधारीत करण्यात आली आहे.

दारिद्रय रेषेवरील परंतु वार्षिक उत्पन्न रु.९६०००/- पेक्षा कमी असलेल्या कुटुंबाकरीता अनुज्ञेय राहणार आहे.

ज्या लाभार्थींची या योजनेमध्ये निवड करण्यात आलेली आहे त्या लाभार्थींच्या कुटुंबास ९० हजार रुपये बिनव्याजी कर्ज व लाभार्थी स्वहिस्सा १० हजार रुपये असे १ लाख रुपये किमतीचे घरकुल लाभार्थीस मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

घरकुल बांधकामासाठी मिळणार बिनव्याजी ९० हजार रुपये

घरकुल बांधकामासाठी दिले जाणारे रु. ९००००/- कर्ज हे बिनव्याजी कर्ज असते. या कर्जाची फेड रु ८३३ महीना या प्रमाणे १० वर्षात करावी लागते.

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थीकडे घरकुल बांधणेसाठी स्वतःच्या मालकीचे ७५० चौ.फुट भूखंड क्षेत्रफळ आवश्यक असते. या ७५० क्षेत्रफळापैकी २६९ चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ करणे आवश्यक असते.

या योजनेचे नाव गृहनिर्माण विभागाकडील शासन निर्णय दिनांक २२ ऑगस्ट २०१४ अन्वये बदलून ते राजीव गांधी घरकुल योजना असे नामकरण करण्यात आले आहे.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.

तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच संबधित अधिकारी साहेबांशी संपर्क साधून या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *