जाणून घेवूयात दिव्यांग सायकल योजना apang yojana maharashtra संदर्भात सविस्तर माहिती. दिव्यांग व्यक्तींना चालण्यास अडचण येते त्यामुळे अशा व्यक्तींना शासनाच्या वतीने सायकलसाठी अनुदान दिले जाते.
तुम्ही जर अपंग व्यक्ती असाल म्हणजेच दिव्यांग व्यक्ती आणि सायकल योजनेचा लाभ घेवू इच्छित असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. समाज कल्याण विभाग अंतर्गत या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळत असतो.
समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरु असतात त्यापैकीच एक योजना म्हणजे सायकल अनुदान योजना होय.
दिव्यांग सायकल योजना संपूर्ण माहिती.
सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागतो. हि योजना सध्या जालना जिल्ह्यामध्ये सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हि योजना सुरु असते.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी मागेपुढे होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये अपंग सायकल योजना संदर्भात तुम्हाला माहिती मिळू शकते.
जालना जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या दिव्यांग व्यक्ती सायकल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतील या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
खाली एक व्हिडीओ देखील दिलेला आहे या व्हिडीओमध्ये दिव्यांग सायकल योजनेचा अर्ज कसा भरावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे तो व्हिडीओ देखील पहा.
ऑनलाईन अर्ज पद्धतीचा अवलंब करा.
- जालना जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन करा किंवा वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर विविध योजनांची यादी दिसेल.
- त्यापैकी दिव्यांगाना स्वयंचलित सायकल पुरविणे असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका.
- आधार नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर अर्ज पहा अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला दिव्यांग सायकल योजना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल.
अशा पद्धतीने तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल किंवा तुमच्या घरातील एकदा व्यक्ती किंवा मित्र दिव्यांग असेल आणि त्यांना सायकल घेण्याची आवश्यकता असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
शेती संबधित विविध योजनांची माहिती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत मिळवू शकता त्यासाठी आमच्या WhatApp Group मध्ये सामील व्हा.