शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी करा अर्ज 25 लाख सबसीडी

शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी करा अर्ज 25 लाख सबसीडी

शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी २५ ते ५० लाख रुपयांपर्यत अनुदान मिळणार असून यासाठी जास्तीत जास्त पशुपालक व शेतकरी बांधवानी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेलेल आहेत.

तुम्हाला शेळी पालन कुक्कुटपालन सुरु करायचा असेल आणि या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घ्या या योजनेविषयी संपूर्ण माहिती.

शेती व्यवसाय करत असतांना अनेक शेतकरी बांधव शेतीला जोडव्यवसाय म्हणून छोटामोठा शेती पूरक व्यवसाय करत असतात. ज्यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य होते.

नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि अशावेळी शेतकरी एखादा शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर शेतकरी बांधव अशा शेतीपूरक व्यवसायामुळे झालेल्या नुकसानीपासून सावरू शकतो.

पुढील लेख पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी कसा कराल अर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ग्रामीण भागातील अनेक तरुण सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. दुग्धव्यवसाय, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन इत्यादी व्यवसाय करून आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात.

वरील व्यवसाय सुरु सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या सहाय्याने शेतकरी बांधव त्याचे व्यवसाय सुरु करतात.

दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. दुध मास अंडी यास दिवसेंदिवस खूप मोठी मागणी होत आहे. यामुळे दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय अनेक तरुण करू इच्छित आहेत.

शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी किती मिळणार अनुदान.

सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत दुग्धव्यवसाय, शेळीमेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन व मूर घास निर्मितीसाठी खालील पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे.

 • कुक्कुटपालन – २५ लाख रुपये.
 • शेळी किंवा मेंढी व्यवसाय करण्यासाठी – ५० लाख.
 • वराह पालनसाठी – ३० लाख.
 • मूरघास निर्मितीसाठी – ५० लाख.

शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो

 • व्यक्तिगत व्यावसायिक.
 • स्वयंसहायता बचत गट.
 • शेतकरी उत्पादक संस्था.
 • कलम आठ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी.
 • शेतकरी सहकारी संस्था.
 • सहकारी दूध उत्पादक संस्था.
 • सह जोखीम गट.
 • सहकारी संस्था.
 • खाजगी संस्था.
 • स्टार्टअप ग्रुप.

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणार लाभ.

इत्यादी या राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेवू शकतात. ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवक तसेच ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढवावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाच्या विशेष अर्थसहाय्याने विविध योजना राबवल्या जातात.

याच योजनेचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने सन 2022 – 2023 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी दिलेली आहे.

ज्या व्यक्ती वरील व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील अशा इच्छुकांनी या अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत सुरु केला जाणाऱ्या व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोठे कराल अर्ज.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालन व डेअरी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा अर्ज करण्यासाठी Department of animal husbandry या वेबसाईटला भेट द्या.

योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग कार्यालयास भेट द्या.

योजना संदर्भातील सविस्तर माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे. योजनेचे स्वरूप काय आहे, अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करता येतो या संदर्भातील सविस्तर माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत देखील शेली मेंढी योजनेचा लाभ मिळतो. नाविन्यपूर्ण योजनेच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *