जाणून घेवूयात नाविन्यपूर्ण योजना 2023 संदर्भात सविस्तर माहिती जसे कि अर्ज कोठे करावा, कागदपत्रे कोणती लागतात व कोणत्या व्यक्ती पात्र आहेत.
नाविन्यपूर्ण योजना 2023 अंतर्गत शेळी मेंढी, गाई-म्हशी व कुक्कुटपालन या योजनांचे अर्ज सुरु झाले होते परंतु वेबसाईटमधील काही तांत्रिक कारणास्तव हि वेबसाईट बंद झालेली आहे. नवीन अर्जदारांनी लगेच अर्ज करू नये अशी सूचना देखील शासनाच्या वतीने देण्यात आलेली होती.
लवकरच हि वेबसाईट परत सुरु होणार असल्याने ज्या शेतकरी बांधवाना शेळी पालन कुक्कुटपालन दुधाळ गायी म्हशी शासकीय अनुदानावर घ्यायच्या असेल ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सध्या मात्र वस्तुस्थिती अशी आहे कि ज्या वेबसाईटवर या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आहे ती वेबसाईट म्हणजे http://ah.mahabms.com हे संकेतस्थळ सुरु झाले कि पुन्हा एकदा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
नाविन्यपूर्ण योजना 2022 संदर्भातील व्हिडीओ पहा
ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनुदानावर जर शेळ्या मेंढ्या गायी म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान मिळाले तर नक्कीच त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
खालील व्हिडीओ पहा
जाणून घेवूयात नाविन्यपूर्ण योजना 2023 संदर्भातील माहिती.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबविली जाते. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत वरती उल्लेख केल्या प्रमाणे विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे
- शेळी मेंढी गट – १० शेळ्या व १ बोकड किंवा १० मेंढ्या व १ मेंढा.
- दुधाळ गाई म्हशीचे वाटप.
- ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाचा २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.
- १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.
- एकदिवसीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.
इत्यादी योजनांसाठी अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पुढील लेख पण वाचा शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी करा अर्ज 25 लाख सबसीडी
खालील प्रमाणे राबविली जाते योजना
08 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख होती परंतु वेबसाईट बंद असल्याने ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्ज स्वीकारण्याची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेच्या आत अर्जदारास अर्ज करावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राथमिक लाभार्थ्यांची निवड केली जाते ही प्रक्रिया २५ डिसेंबर पर्यंत चालणार होती.
प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल. पात्र लाभार्थ्यांची २२ जानेवारी २०२३ नंतर अंतिम यादी पात्रता यादी तयार करून पुढे अनुदानाचा लाभ दिला जाईल.
अनुदानाचे स्वरूप कसे असेल
• ७५ टक्के अनुदान SC, ST तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दिले जाईल.
• जे लाभार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत अशा लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते.
कोठे कराल योजनेसाठी अर्ज
नाविन्यपूर्ण योजना 2023 साठी वरती सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करता येतो. हा अर्ज स्मार्ट फोनवरून देखील करता येतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा अर्थात आता सध्या वेबसाईट बंद असेल परंतु जेंव्हा ती चालू होईल तेंव्हा याच वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
पुढील योजना पण पहा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
काय आहेत योजनेच्या अटी व शर्ती
जो अर्जदार किंवा लाभार्थी योजनेसाठी अर्ज करू इच्छित असेल त्या अर्जदाराचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असावे.
अर्जदाराने अर्ज सादर करताना असा मोबाईल क्रमांक सादर करावा जो कि सद्यस्थिती सुरळीत सुरु आहे. कारण योजनेच्या पुढील कार्यवाहीचे संदेश त्यावर येतात
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे
अर्जदाराच्या राशन कार्डवर घरातील जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नावे त्याचप्रमाणे त्या सर्वांचे आधार कार्ड नंबर, सदस्यांची संख्या अगदी व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.
कुटुंबातील एकाच व्यक्तीस नाविन्यपूर्ण योजना 2023 योजनेचा लाभ घेता येईल.
माहिती पूर्णतः खरी असावी माहिती अचूक व खोटी आढळून आल्यास निवड रद्द केली जाते हि बाब अर्जदाराने कसोसीने लक्षात ठेवावी.
तर अशा पद्धतीने आपण नाविन्यपूर्ण योजना 2023 अंतर्गत शेळी मेंढी, कुक्कुटपालन व दुधाळ गायींसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.