शेळी पालन योजना वेबसाईट सुरु असा करा online अर्ज 2023

शेळी पालन योजना वेबसाईट सुरु असा करा online अर्ज 2023

शेळी पालन योजना वेबसाईट सुरु झाली आहे. जाणून घेवूयात sheli palan karj yojana संदर्भातील माहिती. जेणे करून तुम्हाला शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान मिळू शकेल. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा व व्हिडीओ देखील पहा.

WhatsApp Group
WhatsApp Group

दुधाळ गायी म्हशी, शेळी मेंढी गट वाटप 1000 मांसल कुक्कूट पक्षी इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार होता. mahabms.com हि वेबसाईट काही दिवसापासून बंद होती.

परंतु हि वेबसाईट आता सुरु झाल्याने अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालेलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजना अंतर्गत खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहे online application for goat farming started.

दुधाळ गायी म्हशींचे वाटप करणे.

शेळी मेंढी गट वाटप करणे.

1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

शेळी पालन योजना वेबसाईट सुरु झाली.

महाराष्ट्र शासनच्या पशुसंवर्धन विभागाच्या mahabms.com या वेबसाईटवर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. परंतु काही दिवसांसाठी हि शेळी पालन योजना वेबसाईट बंद असल्याने अर्जदारांना अर्ज करता येत नव्हते आता मात्र पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी हि वेबसाईट सुरु झालेली आहे.
त्यामुळे ज्यांना शेळी पालन कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान हवे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज सदर्फ करून द्यावे असे आह्वान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज online application कसा करावा लागतो या संदर्भातील एक व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे.

तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि शेळी पालन कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेवू शकता.

योजनेचे नावनाविन्यपूर्ण योजना
अर्जऑनलाईन
अर्ज करण्याची लिंकअधिकृत वेबसाईट
सबसिडीसर्वसाधारण गटासाठी ५० टक्के तर अनुसूचित जातीसाठी ७५ टक्के अनुदान

शेळी पालन कर्ज योजना 2022 संदर्भातील खालील माहिती पहा.

  • ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्याआधी जाणून घेवूयात navinya purn yojana online application process संदर्भातील महत्वाची माहिती.
  • ज्या वाक्यासमोर लाल चिन्हे आहेत ती माहिती भरणे अनिवार्य असणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठीफ अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबरची नोंदणी करता येणार आहे.
  • अर्जदाराने नोंदणी करतांना वापरात असणारा मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाइल नंबर वर अर्जाची सद्यस्थिति एसएमएस द्वारे संदेश येणार असल्याने मोबाईल नंबर व्यवस्थित सादर करावा.
  • अर्ज सादर करतांना जो मोबाईल नंबर सादर कराल तो नंबर नंतर बदलता येणार नाही.
  • जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमतीचा असेल तर त्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
  • अर्जदाराच्या राशन कार्डवर जेवढे सदस्य आतील त्या सर्व सदस्यांची नावे, आधार नंबर इत्यादी माहिती सादर करणे आवश्यक असणार आहे.
  • एक कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेवू शकते.
  • नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेत असताना अर्जामध्ये अर्जदार जी माहिती सादर करणार आहे ती खरी असणे गरजेचे आहे. माहिती चुकीची आडळल्या तर अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज सादर करतांना अर्जदारास स्वताचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. तासेच्फ अर्जदाराने स्वतःच्या स्वाक्षरीचा फोटो देखील अपलोड करणे गरजेचे आहे. फोटोची साईज ८० के.बी. पर्यंत असावी तर
  • स्वाक्षरी साईज ४० के.बी. पर्यंत असावी. दोन्ही ठिकाणी.
  • फोटो आणि स्वाक्षरीचा format JPG, jpeg, किंवा PNG असावा

योजना निवड पद्धत scheme selection method

  • सगळ्यात आधी अर्जदारास ऑनलाईन नोंदणी करावा लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
  • त्यानंतर पात्र लाभार्थी यादी तयार केली जाईल.
  • अर्जदाराची प्राथमिक निवड केली जाईल.

ज्या अर्जदारांची निवड होईल ते अर्जदार कागदपत्रे अपलोड करतील.

शेवटी अंतिम निवड होऊन अर्जदारास योजनेचा लाभ दिला जाईल.

पुढील लेख पण वाचा ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप निधी झाला उपलब्ध जी आर आला.

नाविन्यपूर्ण योजना २०२२-२३ navinyapurn yojana 2022-23

ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाईल – १४ डिसेंबर २०२२  ते ११ जानेवारी २०२३

डेटा बॅकअप केला जाईल. १२ ते १३ जानेवारी २०२३

रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड करणे – १४ – १८ जानेवारी २०२३

राखीव दिवस – १९ जानेवारी २०२३

मागील वर्षी ज्या अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करण्यात येणारा कालावधी – २० ते २७ जानेवारी २०२३

राखीव दिवस – २८ जानेवारी २०२३

पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करण्यात येणारा कालावधी – २९ ते ५ फेब्रुवारी २०२३

राखीव दिवस – ६ फेब्रुवारी २०२३.

लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करण्याचा कालावधी – ७ ते ८ फेब्रुवारी २०२३.

ज्या दिवशी अंतिम कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल तो दिवस – ९ फेब्रुवारी २०२३.

राखीव दिवस – १० फेब्रुवारी २०२३.

अंतिम पात्रता यादी तयार करणे – ११ फेब्रुवारी २०२३.

वरील प्रमाणे नाविन्यपूर्ण योजना २०२२-२३ ची कार्यवाही करण्यात येणार आहे. संपूर्ण कालावधीचा विचार जर केला तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ६१ दिवस एवढा कालावधी लागणार आहे.

नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. Mahabms 2022 application form

या लेखाच्या सर्वात शेवटी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी मेढी वाटप करणे, दुधाळ जनावरांचे वाटप करणे व इतर योजनांचा अर्ज कसा करवा लागतो या संदर्भातील व्हिडीओ दिलेला आहे.

तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदारास mahabms.com या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर दिसत असलेल्या अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.

नोंदणी केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर युजर आयडी व पासवर्ड येईल.

युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगीन करा.

लॉगीन झाल्यावर अर्ज ओपन होईल अर्जदारास दिलेल्या योजनांपैकी एक योजना निवडायची आहे आणि त्या संदर्भातील अचूक माहिती अर्जामध्ये भरायची आहे.

अर्जामध्ये प्रामुख्याने बँकेची माहिती योजना संदर्भातील माहिती सादर करायची आहे. शिवाय फोटो, स्वाक्षरी देखील अपलोड करावा लागणार आहे.

सर्वात शेवटी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

नाविन्यपूर्ण योजना २०२२ -२३ योजेंचा लाभ घ्या.

ग्रामीण भागामध्ये शेती करत असताना शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय मोठ्याफ प्रमाणत केले जातात. यामध्ये प्रामुख्याने शेळी पालन, दुग्धव्यवसाय, व कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय केले जाते.

बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढत असल्याने अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत. अशावेळी अनेक तरुणांना शेतीपूरक व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु भांडवलाअभावी त्यांना असे व्यवसाय करता येत नाही.

त्यामुळे तुम्ही जर तरुण सुशिक्षित बेरोजगार असाल आणि शेती पूरक व्यवसाय करू इच्छित असाल शासकीय अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

त्यामुळे goat farming loan scheme in maharashtra योजनेसाठी अर्ज करून द्या जेणे करून तुम्हाला या नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ मिळू शकेल.

शेळी पालन व्यवसाय, दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय या व्यतिरिक्त इतर योजना देखील बेरोजगार तरुणांसाठी लाभदायक असतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी करा अर्ज 25 लाख सबसीडी

लागणारी कागदपत्रे

अर्जदाराला फोटो ओळखपत्राची सत्यप्रत जोडणे अनिवार्य आहे.

जमिनीचा सातबारा व ८ अ उतारा

अपत्य प्रमाणपत्र तसेच स्वयंघोषणापत्र

आधारकार्डची छायांकित प्रत

७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा गरजेचा

अर्जदार अनुसूचीत जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास त्या अर्जदारास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक.

रहिवासी प्रमाणपत्र

अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्या संबधित प्रमाणपत्र

अर्जदाराच्या बँक खात्याचे पासबुक.

राशन कार्डची छायांकित प्रत किंवा कुटुंब प्रमाणपत्र.

अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.

शेळी पालन योजनेसाठी किती अनुदान मिळते?

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवार्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के तर खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान मिळते.

अर्ज कसा करावा?

शेळी पालन, कुक्कुटपालन, दुधाळ जनावरे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी पालन योजनेसह इतर विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

शेळी पालन योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात?

शेळीपालन व इतर योजनांसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. लेख सविस्तर वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *