गरिबांना मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
पुढील लेखपण वाचा शेळी पालन योजना वेबसाईट सुरु असा करा online अर्ज
पुढील वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी twitter दिली आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांचे खालील ट्वीट बघा.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब जनतेला जो मोफत अन्यधान्य पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी २ लाख कोटी खर्च येणार आहे. हा खर्च केंद्र शासन उचलणार आहे.
गरीब वर्गातील 81.35 कोटी लोकांना केंद्र सरकारने एक प्रकरे हे न्यू इयर गिफ्टच दिलेले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत प्रति किलो दोन ते तीन रुपये दराने प्रति व्यक्तीस पाच किलोग्रॅम धान्य दरमहा देण्यात येते. अंत्योदय धान्य योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य केंद्र सरकारकडून दिले जाते.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत गरीब जनतेला ३ रुपये प्रतीकिलो दराने तांदूळ तर २ रुपये प्रतीकिलो दराने गहू देण्यात येतो.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत मोफत धान्य मिळणार असल्याने गरीब जनतेस याचा फायदा होणार आहे. गरिबांना मोफत धान्य १ जानेवारी २०२३ पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.