राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेसाठी 50 टक्के अनुदान मिळणार

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेसाठी 50 टक्के अनुदान मिळणार

राष्ट्रीय गोकुळ मिशन  rashtriya gokul mission अंतर्गत शेतकरी बांधवाना दुग्धव्यवसाय करण्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बल्यान यांनी दिली आहे.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

भारतातील तरुण शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय गोकुळ योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक बेरोजगार तरुणांना राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेतून रोजगार निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना अंतर्गत खालील व्यवसाय सुरु करता येईल

  • दुग्धव्यवसाय (गायी म्हशी)
  • शेळी पालन
  • कुक्कुटपालन
  • वराह पालन

वरील व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडून ५० अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

योजनेचे उद्देश rashtriya gokul mission  aim

  • आधुनिक तंत्रज्ञान वापरून दुग्ध उत्पदान वाढविणे.
  • प्रजननासाठी उच्च अनुवांशिक गुणवत्तेच्या वळूंच्या वापराचा प्रसार करणे.
  • प्रजनन नेटवर्क बळकट करून आणि शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन सेवा पुरवून कृत्रिम रेतन वाढवणे.
  • वैज्ञानिक आणि सर्वांगीण पद्धतीने देशी गायी आणि म्हशींचे संगोपन आणि संवर्धनाला प्रोत्साहन देणे.

प्रोजेक्ट रिपोर्ट, अनुदान व इतर माहितीसाठी पशुपालन व डेअरी विभागाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा पशुसंवर्धन विभागाला देखील तुम्ही भेट देवू शकता.

योजनेचे नावराष्ट्रीय गोकुळ मिशन
योजना कोण राबवितेकेंद्र सरकार
कोण असणार लाभार्थीशेतकरी व पशुपालक
योजनेचा उद्देशस्वदेशी गायींचे संरक्षण व संवर्धन करणे
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://dahd.nic.in/

योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • वयाचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर
  • ईमेल आयडी

योजनेसाठी लागणारी पात्रता

  • अर्जदार भारतीय रहिवासी असायला हवा.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे.
  • शेतकरी व पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • ज्यांना शासकीय पेन्शन आहे असे अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.

राष्ट्रीय गोकुळ मिशन  योजना rashtriya gokul mission  संदर्भातील मार्गदर्शक pdf साठी येथे क्लिक करा.

तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या तालुक्याच्या पशुसंवर्धन विभाग कार्यालयास भेट देवून देखील या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवू शकता.

विविध शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *