पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईपकरिता मिळते 30 हजार रुपये pvc pipe subsidy 2024

पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईपकरिता मिळते 30 हजार रुपये pvc pipe subsidy 2024

पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाईपसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदान मिळते pvc pipe subsidy 2024 जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने शेतकऱ्यांचे शेत खाली आहे अशावेळी शेतकरी बांधव पेरणी सुरु होण्यापूर्वी शेतातील बाकी राहिलेली कामे पूर्ण करून घेतात.

बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या गट नंबरमध्ये असते. अशावेळी विहीर एका गटात असेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी नेणे शक्य होत नाही.

अशावेळी जेंव्हा शेत मोकळे झालेले असते म्हणजेच उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याचे काम करून घेतात.

पाईप लाईन योजना अनुदानावर मिळेल PVC Pipe असा करा अर्ज

पीव्हीसी पाईपसाठी किती मिळते अनुदान pvc pipe subsidy 2024

PVC Pipe subsidy संदर्भात माहिती जाणून घेवूयात. पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त ३० हजार रुपये एवढी सबसिडी मिळते.

पीव्हीसी पाईप अनुदान pvc pipe subsidy 2024 मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज Mahadbt web portal शेतकरी करू शकतात.

पाईपलाईन करण्यासाठी PVC पाईपची आवश्यकता असते आणि PVC पाईप महाग असल्याने अनेक शेतकरी इच्छा असूनही त्यांच्या शेतामध्ये पाईप लाईन करू शकत नाही.

तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करत असाल आणि तुम्हाला PVC पाईपवर अनुदान हवे असेल तर त्यासाठी ३० हजार रुपये एवढे अनुदान मिळते.

अर्ज कोठे करावा आणि किती मिळतात पाईप

अर्जदार जास्तीत जास्त ४२८ मीटर्स लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात म्हणजेज जवळपास ७० पाईपसाठी शासनाकडून अनुदान मिळते.

जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाते. यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेवू शकतात.

तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.

pvc pipe subsidy 2024 लाभार्थी पात्रता

बिरसा मुंढा कृषी क्रांती योजना अंतर्गत हे अनुदान मिळते. अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता अशी आहे.

लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.

लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे.

जमिनीचा सातबारा व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखाच्या मर्यादेत असावी.

जमीन कमीत कमी २० गुंठे व व जास्तीत जास्त ६ हेक्टरपेक्षा जास्त नसावी.

एकदा या योजनेचा लाभ घेतला कि पुढील ५ वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशा पद्धतीने बिरसा मुंढा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतामध्ये पाईप लाईन करण्यासाठी अनुदान मिळते. तुम्ही देखील पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.

असा करा ऑनलाईन अर्ज

Maha dbt या शेतकरी वेबपोर्टलवर लॉगीन करा.

अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.

सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

मुख्य घटक या रकान्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.

बाब या चौकटीमध्ये क्लिक करताच विविध पर्याय दिसेल त्यापैकी पाईप्स हा पर्याय निवडा.

उपघटक या चौकटीवर क्लिक करून PVC पाईप हा पर्याय निवडा.

पाईपची लांबी टाका. जास्तीत जास्त ४२८ एवढी लांबी स्वीकारली जाते.

त्यानंतर अर्ज जतन करा.

अधिकृत वेबसाईट लिंक

अर्ज सादर करण्याची पद्धत

अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा लागतो. एक सुचना येईल ती सविस्तर वाचून घ्या. पहा या बटनावर क्लिक करा.

योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा.

योजनेच्या अटी व शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

तुम्ही जर नवीन असाल तर २३.६० एवढे पेमेंट करा. पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. दिलेल्या पर्यायामधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून द्या.

अशा पद्धतीने तुम्ही pvc pipe subsidy 2024 पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करू शकता.

पीव्हीसी पाईपसाठी किती अनुदान मिळते?

बिरसा मुंढा कृषी क्रांती योजना अंतर्गत pvc pipe साठी ३० हजार रुपये एवढे अनुदान मिळते.

PVC Pipe subsidy मिळविण्यासाठी अर्ज कोठे करावा?

पीव्हीसी पाईप अनुदान मिळविण्यासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाते आणि नंतर लाभ दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *