सौर कृषिपंप व विद्युत जोडणीचे काम गतीने होणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात माहिती दिली यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकरी बांधवानी सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेले आहेत.
काही शेतकरी बांधवांचे अर्ज मंजूर देखील झाले असून त्यांनी कृषी पंपासाठी भरावा लागणारा स्वहीस्सा देखील भरलेला आहे.
असे असताना देखील शेतकरी बांधवाना काही भागात अजून सौर कृषी पंप मिळालेले नाहीत. कुसुम योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना हे सौर कृषी पंप शासकीय अनुदानावर दिले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवानी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत.
पुढील योजना पण पहा saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.
सौर कृषी पंप वितरण करण्यास हवी तशी गती अजून मिळालेली नाही.
सौर कृषी पंप योजना अर्थात ‘कुसुम’ योजनेच्या अ, ब, क मध्ये काम सुरु असून ५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यात फिडर सोलरायझेशनला गती देण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेमुळे शेतकरी बांधवाना फायदा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवाना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु करण्यात आले आहे. ज्या शेतकरी बांधवानी वीज जोडणीसाठी पैसे भरलेले आहेत परंतु वीज जोडणी अद्याप प्रलंबित आहे.
अशा पहिल्या टप्प्यातील प्रलंबीत जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
सौर कृषिपंप प्रक्रियेस मिळणार गती.
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषिपंप मिळण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
केंद्र शासनाने “सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजना (RDSS) हा कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. यामुळे अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारा वीज पुरवठा होणार आहे.
या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने ३९ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत.
त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना कृषी पंप मिळालेला नाही त्यांना आता लवकरच कृषी पंप मिळण्याचा मार्ग मोकळा झालेलं आहे तसेच ज्या शेतकरी बांधवाना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे त्यांना देखील या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
५ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाचे आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रलंबीत वीज जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.