saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.

saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.

तुम्हाला जर नवीन सौर कृषी पंपासाठी saur urja kusum yojana ऑनलाईन अर्ज करायचा असेल किंवा तुम्ही अर्ज केला असेल आणि पेमेंट करायचे बाकी असेल तर त्या संदर्भात माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला असून खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.

नवीन सौर उर्जा पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा saur urja kusum yojana त्याच प्रमाणे लाभार्थीला सौर कृषी पंपासाठी पेमेंट करण्याची शेवटची तारीख किती आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

अनेक शेतकऱ्यांनी सौर उर्जा पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. काही काही शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचे संदेश देखील आले होते. मध्यंतरी पेमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणत अडचण येत होती त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांमध्ये निराशेचे वातावरण आढळून आले होते.

पुढील माहिती पण कामाची आहे. पहा कोणत्या पंपासाठी किती मिळेल अनुदान लाभार्थीला किती भरावे लागणार पैसे.

saur urja kusum yojana लाभार्थी हिस्सा भरण्याची तारीख वाढली.

सौर कृषी पंपासाठी पेमेंट करण्याचा पर्याय काही दिवसापासून सुरु झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचे संदेश आले होते त्यांनी महाउर्जा वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करूनच पेमेंट करायचे आहे.

सौर कृषी पंप योजना टप्पा – २ ची प्रभावी अंमलबजावणी सुरु झालेली आहे. यासाठी लाभार्थ्यांनी नवीन नोदणी करणे तसेच लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिलेला आहे.

तुम्ही देखील सौर कृषी पंप योजनासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि लाभार्थी हिस्सा भरण्याचा पर्याय तुम्हाला दिसत असेल तर लगेच पेमेंट करून द्या. कारण लाभार्थी हस्सा भरण्याची तारीख दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

saur urja kusum yojana खालील जिल्ह्याचा कोटा उपलब्ध लगेच करा ऑनलाईन अर्ज

जर तुम्हाला सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील जिल्ह्यासाठी लगेच सौर कृषीपंपासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या जेणे करून तुम्हाला सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळू शकेल. खालील जिल्हाच्या सौर कृषी पंप कोटा उपलब्ध आहे.

 • अकोला.
 • अमरावती.
 • भंडारा.
 • चंद्रपूर.
 • गडचीरोली.
 • गोंदिया.
 • कोल्हापूर.
 • नागपूर.
 • पालघर.
 • रायगड.
 • रत्नागिरी.
 • सांगली.
 • सातारा.
 • सिंधुदुर्ग.
 • ठाणे.
 • वर्धा.

पेमेंट करण्यासाठी BHIM UPI किंवा क़्यु आर कोड स्कॅन करून देखील पेमेंट करता येते. लाभार्थ्यांना जर ऑनलाईन पेमेंट करण्यास अडचण येत असेल तर ऑफलाईन पेमेंट देखील करता येते.

saur urja kusum yojana

पेमेंट करण्यासाठी म्हणेच लाभार्थी हिस्सा भरण्यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा भरण्यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही लाभार्थी हिस्सा भरणा परिपत्रक बघू शकता.

सौर कृषी पंपासाठी नवीन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • pm kusum yojana या वेबसाईटवर जा. डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
 • अर्ज भरतांना परामुख्याने खालील माहिती तुम्हाला अर्जामध्ये भरावी लागणार आहे.
 • नवीन किंवा बदली डीझेल पंपाची विनंती – या ठिकाणी डीझेल पंप आहे हा पर्याय निवडा आणि त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा.
 • अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती.
 • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करा.
 • माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यावर होय पुढे चला या बटनावर क्लिक करा.
 • अर्ज व्यवस्थित भरून सादर केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 • verify otp या बटनावर क्लिक करा.
 • otp पडताळणी झाल्यवर तुमच्या मोबाईलवर युजरनेम आणि पासवर्ड येईल तो टाकून लॉगीन करा.
 • या ठिकाणी अर्जदाराची माहिती दिसेल पुढे जाण्यासाठी Complete your form go ahead या बटनावर क्लिक करा.
 • तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी दिसेल. जी माहिती अपूर्ण आहे ती पूर्ण करा.
 • सर्वात शेवटी अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करून अर्ज दाखल करा.
 • अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर पैसे भरण्याचा संदेश येईल. त्यानंतर पैसे भरा या बटनावर क्लिक करून पेमेंट करा.
 • पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय  दिलेले आहेत. तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केले तर लगेच पुरवठादार निवडा या बटनावर क्लिक करून तुम्ही सौर उर्जा पंपासाठी पुरवठादार निवडू शकता.

वरील पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हि माहिती अधिक चांग्ल्याज पद्धतीने समजून घेण्यासाठी एक उत्तम ग्राफिक्स असलेली pdf फाईल तुम्ही बघू शकता किंवा download करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *