शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार अनुदान मिळणार आहे. हे अनुदान बोनसच्या स्वरुपात असणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यानी नुकतीच दिली आहे. यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहायता मिळणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
अतिवृष्टीमुळे ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना हेक्टरी 15,000 रुपये बोनस भेट देण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसेच.
शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना हा लाभ थेट बँकेच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
पुढील लेख पण वाचा पिक नुकसान भरपाई 30 दिवसात मिळणार नसता..
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार हेक्टरी 15 हजार अनुदान
नवीन वर्षानिमित्त शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना या नुकसानीमधून सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होते. या अधिवेशनामध्ये शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना 15000 बोनस देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे CMO Mahrashtra या मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर देण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
हेक्टरी 15 हजार अनुदान संदर्भातील माहिती पहा
मुख्यमंत्री कार्यलयाच्या वतीने खालीलप्रकारची माहिती दिलेली आहे.
“सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल.
याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. हा बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही. केंद्र शासनाने राज्याला 15 लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजूरी दिली आहे.”
वरील प्रकारची माहिती मुख्यमंत्री कार्यलयाच्या वतीने ट्वीटरवर देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट.
अतिवृष्टी राज्यातील शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतातूर आहे. अतिवृष्टीतून जे काही पिक वाचले तर त्या पिकास देखील योग्य भाव मिळत नाही अशा बिकट परिस्थितीमधून आज शेतकरी बांधव जात आहे.
अशावेळी शासनाच्या वतीने दिली जाणाऱ्या या १५ हजार प्रती हेक्टरी मदतीमुळे शेतकरी बांधवाना नक्कीच दिलासा मिळणार आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांना हि शासनाकडून एकप्रकारे नवीन भेटच देण्यात आलेली आहे.
अधिक महित्तीसाठी येथे क्लिक करा.
अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा
२०२२ या वर्षामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाई पोटी शासनाच्या वतीने आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली होती परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही हि मदत मिळालेली नाही.
ज्या शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळालेली नाही त्या शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा करावी असे निर्देश पिक विमा कंपनीस दिले आहेत.
अशा करूयात कि जे शेतकरी बांधव नुकसानभरपाई आर्थिक सहाय्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना हि नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी.
हेक्टरी १५ हजार रुपये बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
१५ हजार रुपये बोनस योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने २ हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादेची अट ठेवण्यात आलेली आहे.
थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये मदतीची हि रक्कम जमा केली जाणार आहे.