सोन्याच्या भावात मोठी वाढ पहा किती किमतीवर पोहचले सोने

सोन्याच्या भावात मोठी वाढ पहा किती किमतीवर पोहचले सोने

सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून तुम्ही जर सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल किंवा त्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

सोन्याच्या दारामध्ये सतत वाढ होत आहे. बुधवारी सोन्याच्या किमतीमध्ये ३०० रुपयांची वाढ होऊन सोन्याने भाववाढीची उच्च पातळी गाठली आहे.

लगीन सराई सुरु होत आहे अशामध्ये सोने व चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शहरीभागासह ग्रामीण भागामध्ये लग्नसमारंभासाठी सोन्या चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात केले जातात.

पुढील लेख पण पहा सोयाबीन 8700 कापूस 12700 मुख्यमंत्री शिष्टमंडळ नेणार

मागील काही महिन्यापासून होत आहे सोन्याच्या भावात मोठी वाढ.

परंतु आता सोन्याचा भाव आता दिवसेंदिवस वाढत चालला असून वरबापाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटू शकतात.

गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या भावामध्येवाढ होत आहे. सोन्याच्या भावामध्ये बुधवारी पुन्हा तीनशे रुपयांची वाढ झाली. सोन्याचा दर 29 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

बुधवारी सोन्याचा भाव 56300 रुपये प्रति तोळा असा होता. मागील दोन दिवसांमध्ये सोन्याच्या भावात नऊशे रुपयांची वाढ झाली आहे.

2022 या वर्षाच्या अखेरपासून भावात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी सोने 350 रुपयांनी वधरून सोन्याचा भाव 55 हजार 250 रुपयावर पोहोचला होता. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी पुन्हा सोन्याच्या दरामध्ये  150 रुपयांची वाढ होऊन ते 55 हजार 400 रुपयांपर्यंत पर्यंत पोहचले होते.

जानेवारी महिन्यामध्ये सोन्याचे भाव स्थिर राहिले होते

सोन्याच्या भावामध्ये पुढील काही दिवसामध्ये तेजी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोन्यामध्ये अनेकजन गुंतवणूक करू इच्छित असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

शेअर बाजारामध्ये इतर गुंतवणुकीप्रमाणे सोन्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. परंतु ग्रामीण भागामध्ये सोने खरेदी करून गुंतवणूक केली जाते. काही गरज भासल्यास खरेदी केलेले सोने विकून ती गरज भागविली जाते.

सोने जर खरेदी केले तर ऐनवेळी पैशांची गरज भागते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. सोन्याचे दर कमी जास्त होत असल्याने यामध्ये थोडा फार नफा तोटा होण्याची देखील शक्यता असते.

त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करण्यास इच्छुक असल तर सोने मार्केटचा बाजार भाव बघूनच सोने खरेदी करा. जेणे करून कमी तोटा व जास्त फायदा मिळू शकेल.

सध्या सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्यामुळे सोन्याच्या दारामध्ये तरी सध्या तेजीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *