रूफटॉप सोलर योजना 2024 solar rooftop online application

रूफटॉप सोलर योजना 2024 solar rooftop online application

रूफटॉप सोलर योजना म्हणजे काय यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हि आणि इतर माहिती जाणून घेवूयात जेणे करून तुम्हाला देखील सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ मिळू शकेल.

या लेखाच्या सर्वात शेवटी rooftop solar योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. तो व्हिडीओ पाहून घ्या जेणे करून तुम्हाला अर्ज करतांना कोणतीही अडचण येणार नाही.

solar rooftop online application 2024 या संदर्भात या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे. तो व्हिडीओ बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेवू शकता.

ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये विजेवर चालणाऱ्या अनेक उपकरणांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये केला जातो. विजेवर चालणाऱ्या या उपकरणांना विजेचा वापर करावा लागत असल्याने वीज बिल जास्त येते परिणामी अनेक नागरिक हि उपकरणे चालवितांना हात आखडता घेतात.

कितीही लाईटबिल आले तरी घरामध्ये काही उपकरणे हि वापरावीच लागतात जसे कि टीव्ही, पंखा, कुलर, वाशिंग मशीन आणि वेळ पडली तर कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्री देखील.

रूफटॉप सोलर योजना rooftop solar yojana फायद्याची

अशावेळी बिल जास्त येईल या धास्तीने अनेक नगरीक आपल्या घरामध्ये या उपकरणांचा काही मर्यादेत वापर करतात. परंतु तुम्ही जर सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ घेतला तर नक्कीच हवी तेवढी वीज वापरू शकता.

जाणून घेवूयात रूफटॉप सोलर योजना संदर्भातील सविस्तर माहिती.

रूफटॉप सोलर योजना अंतर्गत शासकीय अनुदानावर छतावर सोलर पॅनल लावून रूफटॉप सब्सिडी मिळवू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा आणि कोठे करावा लागतो, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

पुढील लेख पण वाचा Solar panels for home सोलर सिस्टीम घरावर लावा वीजबिल मुक्त व्हा

रूफटॉप योजनेचा अर्ज निशुल्क भरता येतो.

सर्व निवासी ग्राहकांना नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे सूचित करण्यात आले आहे की कोणत्याही विक्रेत्याला राष्ट्रीय पोर्टलवरील अर्जाच्या शुल्कापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क देवू नये. संबंधित वितरण कंपनीने विहित केले नसलेले नेट मीटरिंग चाचणीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये.

रूफटॉप सोलर योजना संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे त्यामुळे देशातील कोणत्याही भागातील नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबधित बँक खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत पोर्टलवर त्या अर्जाचा मागोवा देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेतला जावू शकतो.

नोंदणीकृत विक्रेत्याकडून घ्यावा लागेल रूफटॉप सोलर प्लांट.

संपूर्ण देशासाठी आणि निवासी ग्राहकांना त्यांच्या परिसरातील संबंधित वितरण कंपनीने नोंदणी केलेल्या कोणत्याही एका विक्रेत्याकडून रूप-टॉप सोलर प्लांट बसवावा लागेल.

नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी राष्ट्रीय पोर्टलवर देखील उपलब्ध आहे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील कराराचे स्वरूप राष्ट्रीय पोर्टलवर देण्यात आलेले आहे.

विक्रेत्यांनी ग्राहकाला कमीत कमी पाच वर्षे देखभाल सेवा पुरवल्या पाहिजेत आणि काही चूक झाल्यास संबंधित वितरण कंपनी विक्रेत्याची बँक हमी रोखू शकते.

पहा योजनेची संपूर्ण माहिती

राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आणि नेट मीटरिंगचे शुल्कही संबंधित वितरण कंपनीने निर्धारित केलेले आहे. याशिवाय अनुदान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही विक्रेत्याला किंवा वितरण कंपनीला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

मंत्रालयाकडून अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल असेही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

हि तर झाली रूफटॉप सोलर योजना संदर्भात थोडक्यात माहिती. आता जाणून घेवूयात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो solar rooftop online application.

रूफटॉप सोलर योजना ऑनलाईन अर्ज

 • roof top solar असा कीवर्ड तुमच्या गुगलमध्ये सर्च करा.
 • National portal for rooftop solar अशी लिंक तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करा.
 • आता National portal for rooftop solar ची वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरवर दिसेल. या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक म्हणजे register here व दुसरा Login here.
 • register here या पर्यायावर क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. State Distribution company व consumer account number इत्यादी माहिती टाकावी.
 • दुसऱ्या टप्प्यामध्ये मोबाईल नंबर टाकावा आणि send otp on Sandesh app या पर्यायावर क्लिक करा. जर otp दिलेल्या मोबाईल नंबरवर येण्यास काही अडचण येत असेल तर Sandesh app तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करून घ्या.
 • मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाकून email आयडी टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.

वरील सर्व प्रोसेस पूर्ण केल्यावर तुमच्या इमेल आयडीवर एक इमेल येईल ज्यावर क्लिक करून अर्जदाराला त्याचे खाते सक्रीय करायचे आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

आता असे समजूयात कि तुमचे अकाऊंट ॲक्टिव्ह झाले आहे म्हणजेच सक्रीय झालेले आहे. आता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करा.

 • Apply for roof top solar साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Registered consumer account number टाकायचा आहे. हा नंबर म्हजेच तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलावर असतो.
 • registered mobile number टाका.
 • मोबाईलवर किंवा ईमेलवर आलेला otpटाका आणि लॉगीन करा.
 • Apply for roof top solar असा संदेश दिसेल त्याखाली simplified procedure संदर्भातील सूचना सविस्तर वाचून घ्या. अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि proceed असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • आता तुम्हाला अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे.

रूफटॉप सोलर योजनेसाठी तीन टप्प्यांमध्ये अर्ज सादर करायचा आहे. पहिला टप्पा म्हणजे अर्जाचे तपशील म्हणजेच application details. दुसरा टप्पा म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे Upload documents तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे final submission.

Discom Details खालील माहिती भरावयाची आहे

 • Division name of DisCom या रकान्यामध्ये तुमचा विभाग निवडा. हा विभाग तुमच्या लाईटबिलवर दिलेला असतो.
 • subdivision name.
 • Consumer Account Number.
 • Sanctioned load in KW हा लोड लाईटबिलवर तुम्हाला बघावयास मिळेल तो लोड दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 • Type of connection तुमची कनेक्शनचा प्रकार दिलेल्या पर्यायामधून निवडा.

Solar roof top details मध्ये खालील माहिती टाका.

 • कॅटेगरीमध्ये residential हा पर्याय निवडा. या ठिकाणी Solar roof top calculator देखील दिलेला आहे त्याचा उपयोग देखील तुम्ही करू शकता.
 • Proposed solar plant capacity मध्ये उदारणार्थ १ किलोवॅट टाका.
 • सिंगल फेस हा पर्याय Proposed type of solar connection साठी निवडा.

Details of applicant म्हणजेच अर्जदाराचे तपशील संदर्भात माहिती.

अर्जदाराची माहिती सादर करताना नाव पत्ता असा टाईप करावा जसा तो तुमच्या अलीकडील बिलावर दिलेला आहे.

 • Full name of premises owner person म्हणजेच ज्या परिसरामध्ये सोलर प्लांट उभारला जाणार आहे त्या परिसराच्या मालकाचे नाव टाका.
 • category of applicant या पर्यायामध्ये अर्जदार ज्या जात प्रवर्गातील असेल तो जात प्रवर्ग निवडावा जसे की ST,ST,OBC,General,Other.
 • ज्या परिसरात रूफटॉप सोलर उभारायचा असेल त्या परिसराचा पत्ता टाका.
 • पिन कोड टाका.
 • जागेचा latitude आणि longitude टाका.
 • latitude आणि longitude काढण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हि सर्व माहिती टाकल्यावर save and next या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.

 • मागील सहा महिन्याच्या आतील लाईट बिल. अपलोड करण्यासाठी फाईल साईज जास्तीत जास्त 500KB असावी.
 • ज्या ठिकाणी रूफटॉप सोलर उभारायचा आहे त्या जागेचे प्रुफ. फाईल अपलोड करण्याची साईज 2MB
 • अधिकचे कागदपत्रे देखील तुम्ही अपलोड करू शकता.

कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केल्यानंतर Final submission या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या. जसे तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळी Your application has been submitted successfully असा संदेश येईल. म्हणजेच आता तुमचा अर्ज सादर झालेला आहे.

रूफटॉप सोलर योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

आता पुढील प्रोसेस या ठिकाणी होणार आहे. सध्या feasibility approval status  मध्ये awaiting असे स्टेट्स दिसेल.

तर अशा पद्धतीने हि झाली ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आपण समजावून घेतलेली आहे आता जाणून घेवूयात रूफटॉप सोलर संदर्भातील इतर महत्वाह्ची माहिती.

आता या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या अर्जामध्ये कोणकोणती माहिती सादर करावी लागते. कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भातील सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे तुमचा अर्ज सादर करून द्या. रूफटॉप सोलर योजना ऑनलाईन अर्जाचा खालील व्हिडीओ पहा.

रूफटॉप सोलर योजना किती मिळते सबसिडी

रूफटॉप सोलर योजनेसाठी जी सबसिडी दिली जाते ती प्लांट वर आधारित असते. खालील टेबल बघितल्यास तुम्हाला सिबसिडीचे स्वरूप अगदी चांगल्या प्रकारे समजू शकते.

प्लांट क्षमतामिळणारे अनुदान
3 किलोवॅट पर्यंत18000/20000 प्रती किलोवॅट
3 किलोवॅटच्या पुढे पण 10 किलोवॅटच्या आतपहिल्या तीन किलोवॅटसाठी 18000/20000 प्रती किलोवॅट त्यानंतरच्या किलोवॅटसाठी 9000/10000 प्रती किलोवॅट.
10 किलोवॅटच्या पुढील प्लांटसाठी९४८२२ फिक्स अनुदान

तुम्ही खाजगी विक्रेत्याकडून रूफटॉप सोलर प्लांट लावू शकता आणि वरील प्रमाणे अनुदान मिळवू शकता. अट मात्र अशी आहे कि जो रूफटॉप सोलर विक्रेता आहे तो DISCOM मध्ये नोंदणीकृत असायला हवा.

रूफटॉप सोलर प्लांट लावण्यासाठी विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये करार करणे आवश्यक आहे. हा करार ५० रुपयांच्या बॉंड पेपरवर करवा लागतो.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.

तुम्हाला जर रूफटॉप सोलर प्लांट उभारायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात तर आपण माहिती जाणून घेतली आहे. आता जाणून घेवूयात कि यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात.

DISCOM कडून ऑनलाइन पूर्णता अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अर्जदाराला सबसिडी/CFA दावा करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

 • लाभार्थीचे नाव
 • खाते क्रमांक
 • बँकेचे नाव
 • IFS कोड
 • रद्द केलेल्या चेकची प्रत पोर्टलवर अपलोड करायची आहे.
योजनेचे नावरूफटॉप सोलर योजना
योजना कोण राबवितेकेंद्र सरकार
सबसिडी किती मिळणारप्रती किलोवॅटनुसार
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची वेबसाईटhttps://solarrooftop.gov.in/

अशा पद्धतीने आपण या लेखामध्ये जाणून घेतले आहे कि रूफटॉप सोलर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात व किती सबसिडी मिळते.

अर्ज करण्यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील या लेखामध्ये दिलेला आहे जेणे करून अर्ज सादर करतांना तुम्हाला कोणतीही अडचण येवू नये.

अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

रूफटॉप सोलर प्लांटसाठी किती अनुदान मिळते?

प्रती किलोवॅट नुसार हे अनुदान दिले जाते. अधिक माहितीसाठी लेख वाचा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. शिवाय व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही स्वतः रूफटॉप सोलर योजनेचा ऑनलाईन अर्ज सदर करू शकता.

कागदपत्रे कोणकोणती लागतात?

ऑनलाईन अर्ज सादर करतांना सुरुवातील लाईट बिल व रहिवासी पुरावा आणि तर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज मंजूर झाल्यावर मात्र इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्या कागदपत्रांविषयी या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *