लोखंडी बैलगाडी अनुदान योजना bailgadi anudan yojna 2024

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना bailgadi anudan yojna 2024

जाणून घेवूयात लोखंडी बैलगाडी अनुदान योजना iron bullock cart scheme संदर्भातील माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरु असतात. यापैकीच एक योजना म्हजेचे वैयक्तिक लाभाच्या योजना होय. समाजज कल्याण विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना लोखंडी बैलगाडी शासकीय अनुदानावर दिली जाते lokhandi bailgadi anudan yojna.

शेती संबधित विविध योजनांची महिती मिळवा मोबाईलवर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. त्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रकमेतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय व्यक्तीसाठी व महिला यांच्यासाठी दरवर्षी वेगवेगळया योजना राबविल्या जातात.

यापैकीच एक योजना म्हणजे लोखंडी बैलगाडी पुरविणे. मागासवर्गीय अर्जदारास जिल्हा परिषद अंतर्गत लोखंडी बैलगाडी अनुदानावर पुरविली जाते.

या योजना व्यतिरिक्त इतरही योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जातात. जाणून घेवूयात लोखंडी बैलगाडी अनुदान योजना संदर्भातील माहिती.

पुढील योजना पण पहा जिल्हा परिषद योजना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अर्ज करण्याचे आवाहन

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना अंतर्गत घ्या योजनेचा लाभ.

ग्रामीण भागामध्ये बैलगाडीस अनन्यसाधारण महत्व असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तसेच दैनंदिन जीवनामध्ये प्रवासासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात होता. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतशी नवनवीन वाहनांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली.

शेतीमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु काही अजूनही शेतीमध्ये बैलगाडीचे महत्व अबाधित आहे. शेतामध्ये जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पाणंद रस्ता असतो. या रस्त्यातून वाहने जात नसल्याने आजही शेत दूर अंतरावर असेल तर शेतात जाण्यासाठी बैल गाडीचा वापर केला जातो.

पूर्वी लाकडी बैलगाड्या उपयोगात आणल्या जात होत्या. लाकडी बैलगाड्या वजनाने जड असल्याने खास करून लाकडी बैलगाडीचे चाके जाड असल्याने त्या ओढण्यास बैलांना खूप शक्ती लागत होती.

आता लोखंडी बैलगाडी निर्मिती सुरु झाल्याने हि बैलगाडी जनावरांना ओढण्यास हलकी असते परिणामी या लोखंडी बैलगाड्याच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

विविध शासकीय योजनांचे व्हिडीओ पहा

शेतीसाठी बैलगाडी महत्वाची

ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी बैलगाडी bullock card खूपच महत्वाची असते. बैलगाडीमध्ये शेतातील महत्वाचे समान वाहून नेले जाते. बैलगाडीमध्ये शेतातील धान्य खते औषधी इत्यादी शेती आवश्यक साहित्याची वाहतूक केली जाते.

यामुळे बैलगाडीला शेतीमध्ये खूपच महत्व प्राप्त झाले आहे. नवीन बैलगाडी खरेदी करायची झाल्यास त्यासाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येतो.

शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडी आवश्यक असते परंतु अनेक शेतकरी बांधवांकडे हि बैलगाडी घेण्यासाठी पैसे नसल्याने ते ती खरेदी करू शकत नाहीत.

परंतु तुम्ही जर जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेतला आणि शासकीय अनुदानावर बैलगाडी खरेदी केली तर तुम्हाला कमी किमतीमध्ये हि बैलगाडी मिळू शकते.

लोखंडी बैलगाडी योजना iron bullock card scheme संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयास भेट द्या आणि योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक