अंगणवाडी सेविका भरती 20 हजार पदांच्या भरतीला मान्यता

अंगणवाडी सेविका भरती 20 हजार पदांच्या भरतीला मान्यता

अंगणवाडी सेविका भरती anganwadi bharti 2023 संदर्भात शासनाच्या वतीने मोठी घोषणा करण्यात आली असून 20 हजार पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

शेतकरी बांधवांनो तुमच्या घरामध्ये शिक्षण घेतलेली महिला असेल तर तयार राहा कारण आता लवकरच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000 पेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे.

अंगणवाडी सेविकेची भरती लवकरच सुरु होणार असून यामुळे ग्रामीण भागातील तरुणींना व महिलांना नोकरी मिळण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीमध्ये लहान मुलांना शिकविण्यासाठी अंगणवाडीसेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून सुशिक्षित महिलांची नियुक्ती केली जाते.

पुढील माहिती पण पहा सौर कृषी पंप वितरणास होणार सुरुवात solar pump GR 2023

अंगणवाडी सेविका भरती महिलांना नोकरीची संधी

ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधवांच्या परिवारामध्ये देखील सुशिक्षित महिला भगिनी असतात. अशावेळी त्या महिलांना आपल्या गावातच अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळाल्यास शेतकरी बांधवांच्या परिवारास मदतीचा आर्थिक हातभार लागू शकतो.

सध्या नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु आहे. अशावेळी अंगणवाडी सेविका भरती anganwadi bharti 2023 अंतर्गत सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या वीस हजार पेक्षा जास्त जागांची भरती शासन करणार असल्याने अनेकजन यासाठी उत्सुक आहेत.

राज्याचा महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका भरती संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.

सहा महिन्याच्या आत होणार भरती.

पुढील सहा महिन्याच्या आत या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतांनाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे.

पुढील माहिती पण वाचा नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी

ग्रामीण भागामध्ये सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे. अशावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीमुळे anganwadi bharti 2023 बेरोगारांच्या अशा नक्कीच पल्लवित होणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

बेरोजगारीला आळा घालण्यासाठी तरुण तरुणींनी शेतीपूरक व्यवसाय केल्यास त्यामधून देखील मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती होऊ शकते. शेळीपालन कुक्कुटपालन गाई म्हशी पाळून दुग्धव्यवसाय करणे हा देखील एक मोठा पर्याय रोजगार निर्मितीसाठी ठरू शकतो.

तर अशा पद्धतीने हि भरती लवकरच होणार असून पात्र लाभार्थी यांनी या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणत सहभागी व्हावे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कधी होणार अंगणवाडी सेविका भरती

आजच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत अंगणवाडी सेविका भरती होण्याची घोषणा शासनाने केलेली आहे.

कसा करावा लगेल अर्ज.

अंगणवाडी भरती २०२३ संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. लेख वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *