ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण kamgar renewal

ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण kamgar renewal

जाणून घेवूयात कि ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण संदर्भातील सविस्तर माहिती construction labor work renewal process. बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो.

ऑनलाईन अर्ज संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचे ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण करू शकता.

यासाठी त्यांना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे गरजेचे असते. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रत्येक वर्षी त्या नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते. जाणून घेवूयात बांधकाम कामगार अर्जाचे नूतनीकारण कसे करावे.

बांधकाम कामगारांना शासनाच्या एकूण ३२ विविध योजनांचा लाभ मिळतो. यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर नूतनीकारणासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

WhatsApp Group
WhatsApp Group

ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण करणे अगदी सोपे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करतांना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्जामध्ये कोणती माहिती सादर करावी लागते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही या आगोदर नोंदणी करण्यासाठी जसा ऑनलाईन अर्ज केला होता त्याच पद्धतीने बांधकाम कामगार नूतनीकारण construction labor work renewal पद्धत असते.

बांधकाम कामगार नूतनीकरण व नवीन अर्ज यामध्ये एकच फरक असतो आणि तो म्हणजे अर्जाचे नूतनीकरण करतांना अर्जासोबत पहिल्या अर्जाची पेमेंट पावती जोडावी लागते.

जर तुमच्याकडे पेमेंट केल्याची पावती नसेल तर तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या वतीने एक बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळालेले असते. या कार्डची प्रत देखील ऑनलाईन अर्ज सादर करतांना तुम्ही अपलोड करू शकता.

online renewal application पद्धत.

या अर्जामध्ये इतर माहिती अगोदरच उपलब्ध असल्याने जास्त काही माहिती सादर करावी लागत नाही परंतु जी माहिती सादर करावी लागते ती खालीलप्रमाणे आहे.

  • ठेकेदाराचे किंवा विकसकाचे नाव व त्या संदर्भातील इतर माहिती.
  • ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील

अपलोड करावी लागणारी महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

  • ९० दिवसांच्या कामकाजाचे प्रमाणपत्र.
  • कामगार मंडळाने दिलेले ओळखपत्र किंवा मागील अर्जाचे पेमेंट केल्याची पावती.
  • स्वयंघोषणापत्र

वरील प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण म्हणजेच रीन्यूवल करतांना अपलोड करावे लागतात. बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज रीन्यूवल कसे केले जाते या संदर्भातील माहितीचा खालील व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल.

नवीन बांधकाम नोंदणी

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमची नोंदणी करून घ्या जेणे करून शासनच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकेल.

तुम्हाला जर माहित नसेल कि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करावी लागते त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि नवीन बांधकाम कामगार नोंदणी संदर्भातील नवीन व्हिडीओ व इतर माहिती जाणून घ्या.

नवीन बांधकाम कामगार नोंदणी.

बांधकाम कामगारांना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकूण ३२ योजनांचा लाभ मिळतो. ज्यामध्ये सुरक्षा संच, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, लग्नासाठी आर्थिक सहाय्य, घरकुल योजना व इतर विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.

योजना संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

बांधकाम कामगार नूतनीकरण ऑनलाईन करता येते का?

होय बांधकाम कामगार नूतनीकरण ऑनलाईन करता येते. हे नूतनीकरण ऑनलाईन कसे केले जाते या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

नूतनीकरण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

बांधकाम कामगार नूतनीकरण करण्यासाठी ९० दिवसांच्या कामकाजाचे प्रमाणपत्र, स्मार्ट कार्ड किंवा पेमेंट केल्याची पावती आणि स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो?

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर विविध ३२ योजनांचा लाभ मिळू शकतो.

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कोणत्या वेबसाईटवर करावी लागते?

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *