रेशीम शेतीसाठी मिळणार कर्ज एकरी 1 लाखाची मर्यादा. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.
शेतीमध्ये काळानुरूप बदल होत आहेत अशातच आता रेशीम शेतीला चांगले दिवस येत आहेत. तरुण शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यास प्रोत्साहन म्हणून बँकाच्या वतीने एकरी १ लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.
विविध जिल्ह्यातील शासकीय स्तरावरून जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी रेशीमशेतीकडे वळावे यासाठी प्रोत्साहन दिले जाते. रेशीम कोषास ६८ हजार रुपये प्रती क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळत असल्याने अनेक उदाहरणे बघावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव आता रेशीम शेतीकडे वळतांना दिसत आहे.
पारंपारिक पद्धतीने शेती करत असतांना शेतीमध्ये खर्च जास्त आणि नफा कमी असे चित्र बघावयास मिळते. परिणामी आधुनिक पद्धतीने रेशीम शेती केल्यास प्रती एकर १ लाख रुपये कर्ज मिळू शकणार आहे.
रेशीम शेतीसाठी मिळणार कर्ज बेरोजगारीवर मात करू शकते रेशीम शेती.
सध्या तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालेला आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करायची म्हटल्यास त्यास खर्च जास्त आणि नफा कमी मिळतो.
अशा परिस्थितीत रेशीम शेती केल्यास नक्कीच यामधून ग्रामीण भागात चांगला रोजगार मिळून शेती नफ्यात येईल परिणामी शेतकरी बांधवांकडे पैसा येईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ३० कोटी निधी आला असा करा अर्ज
शेती करत असतांना सगळ्यात मोठी जी समस्या असते ती म्हणजे शेतीसाठी लागणारे कर्ज होय. आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर त्यासाठी पैसा देखील आवश्यक असतो. अशावेळी पैसा उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकरी इच्छा असूनही शेतीमध्ये प्रयोग करू शकत नाहीत.
याच बाबीचे महत्व लक्षात घेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी १ लाख रुपयांचे कर्ज देण्याबाबत बँकांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
रेशीम शेतीस शासनाकडून प्रोत्साहन.
सध्या शासनाच्या वतीने रेशीम शेतीस खूप मोठ्या प्रमाणत प्रोत्साहन दिले जात आहे. तुम्हाला देखील रेशीम शेती करायची असेल तर तुमच्या तालुक्यातील कृषी कार्यालयास भेट द्या. कृषी अधिकारी साहेबांकडून तुम्हाला रेशीम शेती संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते.
शेती नफ्यात आणायची असेल तर काळाच्या ओघात शेतकरी बांधवाना आधुनिकतेची कास धरल्याशिवाय पर्याय राहत नाही. बाजारात काय विकते याचा अभ्यास करून शेतीमध्ये पिक घेणे गरजेचे आहे तेंव्हाच शेतीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या रेशीम कोषास देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाजारभाव मिळत आहे त्यामुळे तुम्ही जर रेशीम शेतीकडे वळलात तर नक्कीच या शेतीमधून चांगला नफा कमवू शकता. त्यामुळे रेशीम शेतीसाठी कर्ज मिळणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.
१ लाख रुपये प्रती एकर प्रमाणे रेशीम शेतीसाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते.
तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात रेशीम शेती संदर्भात अधिकची माहिती मिळू शकते.