आपले सरकार तक्रार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने अशी करा

आपले सरकार तक्रार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने अशी करा

जाणून घेवूयात आपले सरकार तक्रार नोंदणी Aaple Sarkar takrar Nondni कशा पद्धतीने करता येते. या लेखामध्ये सांगितलेली पद्धतीचे अनुकरण केल्यानंतर तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील कोणत्याही विभागाची तक्रार अगदी काही मिनिटामध्ये करू शकता.

या लेखामध्ये एक व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही अगदी सहजपणे आपले सरकार तक्रार नोंदणी करण्याची पद्धत समजून घेवू शकाल त्यामुळे तो व्हिडीओ नक्की बघा.

ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी महराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेत असतांना कधी कधी सामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. अशावेळी शासकीय अधिकारी साहेबांकडून योग्य ती माहिती किंवा मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते.

पुढील योजना पण पहा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

आपले सरकार तक्रार नोंदणी करणे अगदी सोपे

एखाद्या सर्वसामान्य नागरिकांना योजनेची माहिती हवी असते परंतु ती माहिती किंवा त्या योजनेसंदर्भातील मार्गदर्शन न मिळाल्यास सर्वसामान्य माणसाचे आर्थिक व मानसिक हाल होण्याची शक्यता असते.

उदाहरणच घ्यायचे झाल्यास घरकुल योजना असेल किंवा विहिरीचे लाभार्थी असतील, सौचालय बांधकाम असेल किंवा ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येणारी कोणतीही योजना असेल आणि त्या योजनेचा लाभ पात्र असूनही तुम्हाला मिळाला नसेल किंवा लाभ मिळण्यास काही अडचण येत असेल तर या संदर्भात आता संबधित अधिकारी साहेबांची थेट आपले सरकार पोर्टलद्वारे तक्रार करता येते.

आपले सरकार तक्रार नोंदणी संदर्भातील शासन परिपत्रक बघा.

या संदर्भातील एक शासन परिपत्रक नुकतेच काढण्यात आलेले आहे. त्यामुळे आता एखादा अधिकारी किंवा कर्मचारी तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यापासून विनाकारण अडचणीत आणत असेल तर त्या अधिकारी साहेबांची किंवा कर्मचाऱ्यांची तक्रार संबधित विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता.

आपले सरकार तक्रार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करावी लागते या संदर्भात एक उदारण अगदी प्रत्यक्षपणे तुम्हाला मी करून दाखविणार आहे जेणे करून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील या सुविधेचा लाभ घेवू शकता. त्यामुळे ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन आपले सरकार तक्रार वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • आपले सरकार तक्रार करण्यासाठी उपलब्ध असणारी अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • वेबसाईट ओपन केल्यावर दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी तक्रार दाखल करा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर व इमेल आयडी टाकून otp मिळवा.
  • दिलेल्या चौकटीत मोबाईलवर किंवा इमेलवर आलेला otp टाका आणि पडताळणी करून घ्या.
  • जसे हि तुम्ही तुमच्या otp ची पडताळणी कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा आणि अर्ज सादर करा.

वरील पद्धत अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

कोणत्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करता येते?

https://grievances.maharashtra.gov.in/mr या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करता येते.

तक्रार करण्यासाठी लॉगीन करावे लागते का?

आपले सरकार तक्रार पोर्टलवर तक्रार करण्यासाठी कोणतेही खाते असणे गरजेचे नाही. केवळ मोबाईल नंबर किंवा इमेल टाकून त्यावर आलेल्या OTP द्वारे लॉगीन करता येते.

कोणत्याही विभागाची ऑनलाईन तक्रार करता येते का?

होय कोणत्याही विभागाची तक्रार करता येते.

तक्रार करतांना फोटो किंवा कागदपत्रे अपलोड करता येतील का?

ज्या बाबीची तक्रार करायची आहे त्या संदर्भातील फोटो व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली असून फाईल साईजची मर्यादा २ एमबी पर्यत देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *