50 हजार प्रोत्साहन अनुदान लवकरच होणार जमा

50 हजार प्रोत्साहन अनुदान लवकरच होणार जमा

तुम्ही जर नियमित कर्ज परतफेड करत असाल 50 हजार प्रोत्साहन अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवाना 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यात येणार होता. पात्र शेतकरी बांधवाना 50 हजार प्रोत्साहन लाभ देण्यासाठी शासनाने 1000 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना कार्यक्रम अर्थसाह्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे लवकरच हे पन्नास हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

पुढील लेख योजना पण पहा रेशीम शेतीसाठी मिळणार कर्ज एकरी 1 लाखाची मर्यादा

50 हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भातील नवीन जी आर आला

या संदर्भातील जी आर आज म्हणजेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना ५० हजार प्रोत्साहन लाभाची आतुरतेने वाट होती त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज थकलेले होते त्यांना कर्ज माफी मिळाली. त्यानंतर प्रश्न असा उद्भवला कि जे शेतकरी नियमित कर्ज भरणा करतात त्यांना काय लाभ मिळणार.

म्हणून ज्या शेतकरी बांधवानी अल्पमुदतीच्या पिक कर्जाची वेळोवेळी परतफेड केली त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50 हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने केली होती.

शेतकरी बांधव अनेक दिवसापासून करताहेत प्रतीक्षा

परंतु हि घोषणा जेंव्हा केली गेली त्यावेळी ठाकरे सरकारला उतरी कळा लागलेली होती त्यानंतर थोड्याच दिवसानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे आता प्रश्न असा पडला होता कि या ५० हजार प्रोत्साहनपर लाभाचे काय होणार. लाभ मिळेल कि नाही.

नंतर आलेल्या शिंदे सरकारने 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभाचा हा निर्णय कायम ठेवला आणि त्या दिवसापासून शेतकरी बांधवाना हे 50 हजार बँक खात्यामध्ये कधी जमा होतील याची आतुरता लागून राहिलेली आहे.

2022 23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार ज्या शेतकरी बांधवानी अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले असेल आणि त्याची पूर्णपणे परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.

या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

शेतकरी बांधवाना 50 हजार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि तेंव्हापासून शेतकरी या रकमेची वाट बघत आलेले आहेत.

50 हजार प्रोत्साहन निधी मिळविण्यासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या देखील जाहीर करण्यात आल्या. ज्या शेतकरी बांधवांची नावे या याद्यांमध्ये होती त्यांनी आधार प्रमाणीकरण देखील केले असून आता फक्त हा निधी मिळतो कधी याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे.

जी आर पहा

1000 कोटी रकमेस मान्यता

आजच्या म्हणजेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ ला जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

50 हजारअनुदान लाभ संदर्भात जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तो असा आहे.

सन 2022 23 या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी रुपये 1000 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना अर्थसाह्य या लेखाशीर्षअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

तर अशा प्रकारचा हा अनुदान संदर्भातील शासन निर्णय होता हा शासन निर्णय सविस्तरपणे वाचायचा असल्यास महराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्ही भेट देवू शकता.

कधी मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान?

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी शासनाच्या वतीने 1000 कोटी रुपयास शासनाने मान्यता दिली असून त्या संदर्भात शासन निर्णय जरी करण्यात आलेला असल्याने हि रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

कोणत्या व्यक्तीस मिळणार योजनेचा लाभ?

जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशाच शेतकऱ्यांना या 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *