म्हाडाला एकदाच अर्ज करता येणार एक अर्ज एकावर्षासाठी ग्राह्य

म्हाडाला एकदाच अर्ज करता येणार एक अर्ज एकावर्षासाठी ग्राह्य

आता म्हाडाला एकदाच अर्ज करता येणार असून एकदा का हा अर्ज केला तर वर्षभर तोच अर्ज चालणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

शहरातील मध्यमवर्गीयांना आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना हे घर घेणे परवडत नाही. अशावेळी तुम्ही म्हाडा योजनेचा लाभ घेवू शकता. Maharashtra housing and area development authority MHADA

तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे स्वतःचे घर कमी किमतीमध्ये हवे असेल तर अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा योजना अंतर्गत तुम्ही अर्ज सादर करू शकता.

म्हाडाविषयी तुम्हाला कदाचित कल्पना असेलच कि म्हाडा मध्ये लॉटरी पद्धतीने घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येतो.

पुढील योजना पण पण प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेसाठी १० कोटीचा निधी.

म्हाडाला एकदाच अर्ज करता येणार.

गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने म्हणजेच म्हाडाच्यावतीने नागरिकांसाठी लॉटरी पद्धतीमध्ये आता मोठे बदल करण्यात आलेले आहेत. ज्या नागरिकांना म्हाडा योजेंचा लाभ घ्यायचा आहे त्या नागरिकांना एकदाच अर्ज करावा लागणार आहे आणि तोच अर्ज राज्यातील विविध जाहिरातीसाठी वापरता येणार आहे.

म्हाडा योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी नागरिकांना वेळोवेळी अर्ज करावा लागत होता. म्हाडाच्या या नवीन धोरणामुळे नागरिकांना आता वारंवार अर्ज करावा लागणार नाही.

म्हाडाच्या घरांना दिवसेंदिवस नागरिकांकडून मोठ्या प्रमाणत पसंती मिळत आहे.  ज्या ठिकाणी म्हाडाच्या घरांना पसंती मिळत आहे ती मंडळे अशी आहेत.

मुंबई

पुणे

कोकण

औरंगाबाद

वरील मंडळात अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाच्यावतीने हजारो सदनिकांची सोडत काढण्यात येते.

सर्व प्रक्रियेला जवळपास सहा ते आठ महिने लागतात ही प्रक्रिया कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी 5 जानेवारी 2023 पासून म्हाडाच्यावतीने नवीन धोरण स्वीकारले आहे.

म्हाडाच्या वेबसाईटवर लॉटरी पूर्वी माहिती व कागदपत्र भरता येणार आहे.

लॉटरी विजेतांना थेट पत्र मिळणार

म्हाडाच्या या नवीन प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीतील सहभागींना अर्जासोबत पूर्वी विचारलेल्या २७ दस्तऐवजांच्या ऐवजी केवळ ७ कागदपत्रे ऑनलाईन सादर करावे लागतील.

यामध्ये कोणतीही अर्ज प्रक्रिया होणार नाही आणि केवळ दस्ताऐवजाच्या पडताळणीत पात्र ठरलेल्याच समावेश म्हाडाच्या लॉटरी सोडतीमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे पात्रता आधीच ठरलेली असल्याने म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना थेट पत्र दिले जाणार आहे आणि एसएमएस द्वारे कळवले जाणार आहे.

शासनाकडून लॉटरी प्रक्रियेतील या बदलामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा आणि लॉटरी प्रक्रियेत प्रक्रियेला शंभर टक्के पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

म्हाडाच्या या नवीन धोरणामुळे कागद पडताळणीला लागणारा वेळ हा कमी होणार असून पंधरा ते महिन्याभराच्या आत उमेदवारांना घराचा ताबा मिळणार आहे. म्हाडाला एकदाच अर्ज करता येणार असल्याने वारंवार अर्ज करण्याची गरज पडणार नाही.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

बातमी पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *