डाक सेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
तुम्हाला जर भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठीची जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक अर्जदार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ असून या तारखे पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा
डाक सेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज
अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करतांना नियम व अटी व्यवस्थित वाचून घ्यावात. वरील संकेतस्थळावर या सर्व नियम व अटी उपलब्ध आहेत.
इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्यासाठी अधिसूचनेच्या परिशिष्ट पाच (V) मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरावे लागेल.
सध्या नोकरीसाठी फोन कॉल करणे किंवा नोकरीसाठी निवड झाली असल्याचे संदेश मोबाईलवर पाठविले जातात आणि यामध्ये अर्जदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
भारतीय पोस्ट विभाग अर्जदारांना कसलेही फोन कॉल करत नाहीत. संबंधित प्राधिकरणाद्वारेच अर्जदरांशी पत्रव्यवहार केला जातो.
त्यामुळे अर्जदारांनी त्यांची वैयक्तिक माहिती किंवा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी संबधित माहिती अनोळखी व्यक्तीस देवू नयेत आणि कोणत्याही फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी
ग्रामीण भागातील अनेक तरुण भारतीय डाक विभागात नोकरी करण्यास इच्छुक असल्याने चित्र मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. यासाठी कसोसीने तयारी देखील ग्रामीण भागातील तरुणांकडून केली जात आहे.
त्यामुळे भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करण्यसाठी हि संधी चालून आलेली आहे. तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता ऑनलाईन अर्ज करून द्या जेणे करून तुम्हाला हि नोकरी करण्याची संधी मिळेल.
डाक सेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज संबधित अधिकृत माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
माहितीचा स्त्रोत महासंवाद वेबसाईट